आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day:52 वर्षाचा झाला मराठी सिनेमांतील \'डॅडी\', 25 वर्षांनी लहान तरुणीसोबत थाटला आहे संसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक मराठी-हिंदी चित्रपटात कधी गंभीर तर कधी विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे मकरंद देशपांडे आज त्यांचा 52वा वाढदिवस साजरा करत आहे. 6 मार्च 1966 रोजी डहाणू येथे जन्मलेल्या मकरंद यांचे शिक्षण बीपीएम हायस्कुल मुंबई येथे झाले. केवळ मराठी-हिंदीच नव्ह तर तामिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड या चित्रपटांतही काम केले आहे. 1988 साली 'कयामत से कयामत तक' या चित्रपटातून मकरंद यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि मकरंद यांनीही त्यांच्या कामामुळे चित्रपटसृष्टीत त्यांची ओळख मिळविली. अभिनेता शशी कपूर यांची मुलगी संजना कपूरसोबत होते रिलेशनशीपमध्ये..

 

मकरंद देशपांडे यांचे शशी कपूर यांची कन्या संजना कपूरसोबत काही वर्ष प्रेमसंबंध होते. मकरंद यांनी संजना कपूर यांच्या पृथ्वी थिएटरमध्ये त्यांच्या नाटक करिअरलाही सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी 50 लघुनाटक आणि 40 नाटकांत काम केले. त्यांनी सर सर सरला, जोक, मा इन ट्रांजिट, कृष्णा किडींग आणि शेक्सपिअरचा म्हातारा यांसारख्या नाटकात काम केले. संजना कपूर यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर 1993 साली मकरंद देशपांडे यांनी के. के. मेनन यांच्या मदतीने अंश थिएटर ग्रुपची स्थापना केली. 

 

2006 साली सोनाली कुलकर्णीसोबत होते रिलेशनशीपमध्ये..
संजना कपूर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर मकरंद हे मराठी-हिंदी चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या प्रेमात पडले. दोघे जवळपास 4 वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. असे म्हणतात की मकरंद-सोनाली लिव्ह इन रिलेशनशीपमध्येही होते पण काही काळानंतर ते वेगळे झाले. 

 

25 वर्षांनी लहान तरुणीसोबत थाटला संसार.. 
अभिनेता मकरंद देशपांडे यांनी त्यांच्यापेक्षा तब्बल 25 वर्षांनी लहान तरुणीसोबत संसार थाटला आहे. त्यांच्या पत्नीचे नाव निवेदीता पोहणकर आहे आणि ती लेखिका आहे. जवळपास सहा-सात वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. वयातील अंतर जास्त असल्यामुळे यांच्या लग्नाबद्दल अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या पण लोकांची पर्वा न करता यांनी लग्नगाठ बांधली आणि त्यांचा सुखी संसार सुरु आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मकरंद देशपांडे आणि त्यांच्या पत्नीचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...