आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wedding Pix : निर्मिती सावंत झाल्या सासूबाई, मुलगा अभिनय अडकला लग्नाच्या बेडीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सनई चौघड्यांचे सूर घुमू लागले आहेत. 11 डिसेंबर रोजी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लग्नाच्या बेडीत अडकले. तर दुसरीकडे मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेतासुद्धा बोहल्यावर चढला. आम्ही बोलतोय ते मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा मुलगा आणि अभिनेता अभिनय सावंत याच्याविषयी... 

 

निर्मिती सावंत आता ख-या आयुष्यात सासूबाई झाल्या आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा अभिनय 11 डिसेंबर विवाहबंधनात अडकला. अभिनय स्वतः एक अभिनेता असून अलीकडेच आपण त्याला 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' या मालिकेत पाहिलंय. प्रेक्षकांचा लाडका अभिनय त्याची मैत्रीण पूर्वा पंडीतसोबत बोहल्यावर चढला. मुंबईत दोघांचा थाटात विवाह झाला.  


लग्नाला मराठी सेलिब्रिटींची उपस्थिती... 
अभिनय आणि पूर्वी यांच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री रेणुका शहाणे, शिल्पा तुळसकर, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, सिद्धार्थ जाधव, भार्गवी चिरमुले, कविता लाड, वंदना गुप्ते, आशुतोष राणा, चिन्मयी सुमीत, जयवंत वाडकर, शुभांगी गोखले, समीर चौघुले यांच्यासह अनेक कलाकारांनी लग्न आणि रिसेप्शन सोहळ्याला उपस्थिती लावून अभिनय आणि पूर्वीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अभिनयच्या लग्नात निर्मिती सावंत आणि रेणुका शहाणे यांनी खास नऊवारी परिधान केली होती. 


कोण आहे निर्मिती सावंतच्या सूनबाई...
पूर्वा पंडीत हीदेखील एक अभिनेत्री असून तिने रंगभूमीवर काम केले आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून तिने शिक्षण घेतले आहे. मागील 12 वर्षांपासून अभिनय आणि पूर्वा एकमेकांना ओळखतात. आता त्यांनी आपल्या मैत्रीचे रुपांतर लग्नात केले आहे. याचवर्षी 29 ऑक्टोबर रोजी दोघांचा साखरपुडा झाला होता. 


पुढील स्लाईड्सवर बघा, अभिनय आणि पूर्वा यांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...