आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर सुमारे पाच वर्षांपू्र्वी एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात लोकप्रिय अभिनेते आनंद अभ्यंकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी 1 कोटी रुपये नुकसान भरपाईचा दावा केला होता. लोक अदालतमध्ये 72 लाख रुपये मंजुर झाले आहेत.
आनंद अभ्यंकर यांच्या पश्च्यात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. गेल्याचवर्षी त्यांची मुलगी सानिका हिचे लग्न झाले. सानिकाने मराठी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मालिका विश्वात सहाय्यक दिग्दर्शिका, लेखिका म्हणून ती काम करतेय. शिवाय छोट्या पडद्यावरील 'ढोलकीच्या तालावर' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सानिका स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. 23 डिसेंबर 2012 रोजी आनंद अभ्यंकर यांचे अपघाती निधन झाले होते. त्यानंतर सानिकाने आनंद अभ्यंकर यांच्यावर ब्लॉग लिहायला सुरूवात केली आणि त्या ब्लॉगचे रूपांतर पुस्तकात झाले. 'अलाइव्ह' (Alive) हे सानिकाच्या पुस्तकाचे नाव आहे.
आनंद अभ्यंकर यांच्यासह अभिनेता अक्षय पेंडसेंचा झाला होता मृत्यू...
डिसेंबर 2012 मध्ये झालेल्या या अपघातात आनंद अभ्यंकर (50) ॉयांच्यासह अभिनेता अक्षय पेंडसे (33) यांचे निधन झाले होते. उर्से टोलनाक्याजवळ बऊर गावानजीक दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अभ्यंकर यांच्या मारुती व्हॅगनार गाडीला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली होती. अपघातानंतर टेंपोचालक घटनास्थळावरून पळून गेला होता. या अपघातात अभिनेते अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रत्युष याचाही मृत्यू झाला होता. एका कार्यक्रमाचे चित्रीकरण संपवून ते पुण्याहून मुंबईकडे निघाले होते. मुंबईला परतत असताना पुण्याला जाणारा टेंपो रस्ता दुभाजक तोडून अभ्यंकर असलेल्या मोटारीवर जाऊन धडकला होता. या भीषण अपघातात अक्षय पेंडसे यांचा जागीच मृत्यू झाला. आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसें यांची पत्नी दिप्ती आणि मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने निगडी येथील जवळच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच अभ्यंकर आणि पेंडसेंच्या मुलाचा मृत्यू झाला होता. तर पेंडसे यांची पत्नी दीप्ती तसेच अभ्यंकर यांचा मोटार चालक किरकोळ जखमी झाले होते.
अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये केले होते आनंद यांनी काम...
आनंद अभ्यंकर हे मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कलाकार होते. ‘शुभंकरोती’, ‘या गोजीरवाण्या घरात’, 'मला सासू हवी' या त्यांच्या गाजलेल्या भूमिका असलेल्या मालिका आहेत. 'वास्तव', 'जिस देश में गंगा रहता है', 'मातीच्या चुली', 'स्पंदन' या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.
पुढे बघा, आनंद अभ्यंकर यांच्या कुटुंबीयांची निवडक छायाचित्रे...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.