आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: \'खंडोबा\'च्या भूमिकेतून फेमस झालेला हा अभिनेता आता कुठे आहे बिझी, जाणून घ्या A to Z

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः 'जय मल्हार' या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारे, पिळदार शरीरयष्टी, भारदस्त आवाज आणि तितकाच दमदार अभिनय करणारे अभिनेता म्हणजे देवदत्त नागे. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन आता काही महिन्यांचा काळ लोटला आहे. मात्र तरीदेखील देवदत्त नागे यांना प्रेक्षक खंडोबाच्या भूमिकेसाठीच ओळखतात. या मालिकेनंतर आता देवदत्त यांनी आपला मोर्चा मोठ्या पडद्याकडे वळवला आहे. 'चेंबुर नाका' या चित्रपटातून ते आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

 

मुळचे अलिबागचे आहेत देवदत्त नागे...

मुळचे अलिबागचे असलेल्या देवदत्त नागेंचा आज (5 फेब्रुवारी) वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांच्या खासगी आयुष्याविषयीची माहिती आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून देतोय.


कुटुंबाविषयी...
देवदत्त नागे विवाहित असून त्यांना एक मुलगा आहे. कांचन हे त्यांच्या पत्नीचे तर निहार हे त्यांच्या मुलाचे नाव आहे. त्यांना तीन थोरल्या बहिणी आहेत. देवदत्त यांनी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र त्यांनी अभिनयाची निवड केली.


पुढे वाचा, मॉडेलिंगद्वारे करिअरला सुरुवात... 

बातम्या आणखी आहेत...