आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनयानंतर दिग्दर्शनानंतर हात आजमावणार \'हा\' मराठी अभिनेता, हिंदी सेलिब्रेटीसोबत करणार काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  'खुलता कळी खुलेना', 'जुळून येती रेशीमगाठी' यांसारख्या मराठी मालिकांतून प्रसिद्धीस आलेला अभिनेता लोकेश गुप्ते आता दिग्दर्शनात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘एक सांगायचंय…UNSAID HARMONY’ (एक सांगायचंय… अनसेड हार्मनी) हा मराठी चित्रपट लोकेश दिग्दर्शित करणार आहे. विशेष म्हणजे हिंदी अभिनेता के. के. मेनन त्याचा मराठी चित्रपटात डेब्यू करत आहे. 

 

लोकेशने त्याच्या करिअरची सुरुवात 2003 साली 'बेदुंध मनाच्या लहरी'द्वारे पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने 'अग्निशिखा', 'वादळवाट', 'कुलवधू', 'लज्जा', 'आभास हा' यांसारख्या मालिकांत तर हिंदी चित्रपट 'अकिरा'मध्येही पोलीस इन्सपेक्टरची भूमिका केलेली आहे. 

 

देवी सातरी प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण 9 मार्चला सुरु होणार आहे. या चित्रपटाचा लाँच सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटाची टीम, के. के. मेननसह इतर काही कलाकार उपस्थित होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, ‘एक सांगायचंय…UNSAID HARMONY’ या चित्रपटाच्या लाँचचे फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...