आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मराठमोळ्या \'फौजी\'नेही केले \'पॅडमॅन\'चे प्रमोशन, पॅड शेअर करत लिहीले, यात लाजण्याचे काय कारण?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - 'लागिरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता म्हणजेच सर्वांचा लाडका 'फौजी' नितीश चव्हाणही 'पॅडमॅन' चित्रपटाचे प्रमोशन करण्यास सज्ज झाला आहे. नितीशने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर सॅनिटरी पॅडचा फोटो शेअर केला आहे ते शेअर करत त्यात लाज बाळगण्यासारखे काही नाही आणि आज ग्रामीण भागात या गोष्टींचा प्रसार होणे फार गरजेचे आहे, असे सांगितले आहे. 

 

नितीश चव्हाणने मालिकेत एका ग्रामीण मुलाची भूमिका साकारली आहे आणि त्यामुळे त्याने ग्रामीण भागातील स्त्रियांचे प्रॉब्लेम्सकडेही लक्ष वेधले आहे. नितिशीने पॅडचा फोटो शेअर करत लिहीले आहे की, "हे जे #पॅड फोटो मध्ये आहे त्यात काही लाज वाटण्या सारखे काही नाही की याचा मासिक पाळी मध्ये वापर होतो म्हूनन ही पोस्ट फक्त लाईक आणि शेअर साठी नाही तर आपल्याला सगळीकडे पसरवायची आहे. जेणेकरून खेडेगावात व जिथे जमेल तितं आज टच स्क्रीनच्या जमान्यात आजुन ही लोकाचे विचार हे ओल्ड नोकिया मोबाईल सारखे आहेत महिलांना पाळी येणे ही नैसर्गिक क्रिया आहे त्यात लाज वाटण्या सारखे काही नाही ह्या विषयावर चर्चा करून त्यातून आपण शिकले पाहिजे. वैचारिक जागरूकता आणि पुरोगामीपणा हा काळानुसार बदलला पाहिजे नुसतेच संस्कृती चे स्तोम नाचवून धार्मिक ते च्या नावाखाली स्त्रियांना मागे ठेवण्याचा काळ बदलला पाहीजे अजून ? किती दिवस आपण समाज संस्कृती धार्मिक ता या गोष्टी चघळणार आहोत.

 

विचार करण्यासारखी पोस्ट आहे आणि यावर प्रत्येकाने जागरुक राहून लाज न बाळगता त्यावर चर्चा केली पाहिजे. मी ही पोस्ट माझ्या सगळ्या बहिनी व आई यांना जाणीव करून देण्यासाठी पोस्ट करत आहे.Padman फिल्ममुळे खूप फरक पडत आहेत..


आधी असा विषय घरापुरताच सीमित होता. तेही आई आणि मुलगी यातच संवाद घडायचा, आता मात्र परिस्तिथी बदलत आहे.. अक्षय कुमारचे कौतुक करावे तितके कमीच.. आणि त्या वेळच्या खऱ्या #PADMAN चे पण कौतुक करायला पाहिजे की त्याने त्या वेळेस हे धाडस केले. समाज परिवर्तन होत आहे..."

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, पॅडमॅनचे प्रमोशन करणाऱ्या नितीशचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...