आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Women\'s Day Spl: सचित म्हणतो, \'पुरूषांनी महिलांच्या योगदानाची जाणीव ठेवणे गरजेचे\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक "स्त्री " असते असे म्हटले जाते. अनेक यशस्वी पुरुषांच्या पाठीशी ढाल बनून त्यांची पत्नी उभी राहिल्यानेच यशस्वी व्यक्ती जीवनात काहीतरी करू शकल्या आहेत. म्हणूनच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अभिनेता सचित पाटील म्हणतो, महिला दिन एकाच दिवशी साजरा न होता तो खरंतर रोज साजरा व्हायला हवा. आणखी काय म्हणाला सचित जाणून घेऊयात त्याच्याच शब्दांत... 

 

सचित म्हणतो, ''महिला दिन एकाच दिवशी साजरा न होता तो खरंतर रोज साजरा व्हायला हवा. इतकं महिलांच महत्व आहे. आज मी जे काही आहे ते माझ्या आई, माझी बहीण आणि माझी बायको शिल्पामुळेच आहे. लहानपणापासून माझ्या आईचं जे योगदान आहे, माझ्यासाठी केलेली मेहेनत त्यामुळे मी इथे आहे. आणि आता माझी बायको माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे जिथे जिथे मला गरज भासते ती न सांगता तिथे असते. जेव्हा एखादा पुरुष यशस्वी होतो तेव्हा त्याच्यामागे महिलांच योगदान असतं. मला महिलांना नाहीतर पुरूषांना संदेश द्यावासा वाटतो... की, पुरुषांनी महिलांच्या योगदानाची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.''


पुढील स्लाईड्सवर बघा, सचितची पत्नी शिल्पासोबतची निवडक छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...