आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नथुराम नावाचं वादळ शांत होतंय, 'हे राम! नथुराम' रंगभूमीवरुन घेत आहे कायमची एग्झिट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ असं भारदस्त आवाजात म्हणणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांचे ‘हे राम.. नथुराम’ नाटक कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या महिन्याभरात या नाटकाचे शेवटचे 10 प्रयोग महाराष्ट्रभर होणार आहेत. मार्चच्या पहिल्या आठड्यात शेवटचे ‘हे राम’ म्हणत ‘नथुराम गोडसे’ शांत होणार आहे. शरद यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून यासंबंधीत माहिती दिली.

 

काय म्हणाले शरद पोंक्षे... 

 

नथुराम नावाचं वादळ शांत होतंय. नमस्कार रसिकहो. 
10 जूलै 1998 पासून नथुराम गोडसे ची भुमिका करतोय. आज फेब्रुवारी 2018. म्हणजे गेली 20 वर्षे ही भुमिका करतोय. 20 वर्ष अनेक नाटक चालले.1000 प्रयोग ही अनेकांनी केलेत. पण नथुराम ची भुमिका करताना 20 वर्ष सतत संघर्षाला मात्र कोणालाच सामोर जावं लागलं नसेल. व या संघर्षाला तोंड देत एकही प्रयोग रद्द न करता एखादी भूमिका करत राहणं हे केवळ आपल्या रसिकांच्या प्रेमामुळेच शक्य झाल. डॉ. लागू. भारतरत्न भिमसेन जोशी. पं सि आर व्यास. सुधिर फडके. आशा भोसले. पं हृदयनाथ मंगेशकर. लिला गांधी. चित्तरंजन कोल्हटकर. स्मिता तळवलकर. भुपेन हजारीका. रवी चोप्रा. विपुल शहा. ही मान्यवरांची यादी खूप मोठी आहे. तर या सर्व थोरांनी माझ्या नथुरामच्या भुमिकेला शाब्बासकी दिली. कौतूक केलं. रसिकांनी तर 30, 40 वेळा नाटकाची पारायण केली. कल्याणला तर अत्रे रंगमंदिर येथे झालेला प्रत्येक प्रयोग बघणारे श्री. पिंपळखरे त्यांचा तर 51 व्या प्रयोगाला सत्कार केला. तर इकडे विरोधकांनी नाटक न बघताच सातत्याने विरोध केला. कित्येकदा माझाही उध्दार केला. मला मारण्याचे हिंसक डावही रचले. काही संकूचीत नाटकवाल्यांनीही पाठ फिरवली. पण तरीही नथुराम 20 वर्षे हाऊसफुल्ल गर्दीत बोलत राहिला. काही काँग्रेस नेत्यांनी खाजगीत नाटक बघून कौतूक केल. या रसिकांच्या ऋणातच रहाण मी पसंत करेन. 

 

पण कोणत्याही कलाकृतीची एक थांबायची वेळ ठरलेली असते. रसिकांनी केव्हा न विचारता का विचाराव. अशा मताचा मी आहे. एखादी कलाकृती जीर्ण होईपर्यंत वाट बघू नये. ती टवटवीत ताजी व लोकांना हवीहवीशी वाटत असतानाच थांबवण्यात मजा आहे. या भुमिकेनं सर्वांना आनंदच दिलाय. ज्यांनी पाहिलं त्यांना आनंदच मिळाला. नाहितर 20 वर्षे ही भुमिका मी करूच शकलो नसतो आणि बंद केल्यामुळेही कित्येकांना आनंदच मिळणारे. त्यातही मला आनंदच आहे. तेव्हा ही आनंददायी भुमिका, हे नाटक हे राम नथुराम, ह्याला पुर्ण विराम देत आहे. पुन्हा ह्या भुमिकेत मी तूम्हाला दिसणार नाही. म्हणून ज्यांचं राहून गेलं असेल, ज्यांना परत एकदा बघायचं असेल तर ही शेवटची संधी. खास आपल्यासाठी शेवटचे 10 प्रयोग करत आहे. त्यानंतर. मी नथुराम ची भुमिका परत करणार नाही. लोकाग्रहास्तव असं लेबल लाऊनही नाही. 

 

पुढे वाचा, शरद पोंक्षे यांनी जाहिर केलेल्या शेवटच्या 10 प्रयोगांच्या तारखांविषयी..

बातम्या आणखी आहेत...