आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउन्हाळी सुट्टी म्हटली की, कामापासुन थोडा उसंत घेत, आपल्या जीवलगांसोबत वेळ घालवण्याचा हक्काचा कालावधी ! यावेळी प्रत्येकजण कुठेतरी दूर थंड ठिकाणी किंवा आपापल्या गावी जाण्याचा बेत आखत असतात, तर काहीजणांना समर केम्प अधिक भावतात. 'मे' महिन्याच्या रखरखत्या उन्हात, सुट्टीवर जाताना स्वतःसोबतच कुटुंबियांच्या आरोग्याचीदेखील विशेष काळजी घ्यावी लागते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी यंदाचा समर व्हेकेशन एका हटके अंदाजात आपल्या कुटुंबीयांसोबत घालवत आहे. 'रणांगण' चित्रपटात गेली दोन वर्ष व्यस्त असलेल्या स्वप्नीलला बायको मुलांना अधिक वेळ देता आला नव्हता, त्यामुळे या उन्हाळी सुट्टीत तो पूर्ण महिनाभर घरात व्हेकेशनची मज्जा लुटणार आहे! त्याच्या या होमरेस्ट व्हेकेशनबद्दल त्याच्याशी केलेली ही बातचीत.
Q. यावर्षीच्या समर व्हेकेशनला कुठे जाण्याचा बेत आहे का?
A. नाही. खरं तर कामामुळे मी सतत कुठे ना कुठे प्रवास करत असतो. त्यामुळे जर थोडा वेळ मिळाला तर मी सर्वात आधी घरचा रस्ताच धरतो. 'रणांगण' सिनेमाच्या चीत्रीकारणात आणि त्यानंतर त्याच्या प्रमोशन कार्यक्रमात खूप व्यस्त होतो. घरापासून बरेच महिने दूर राहिल्यामुळे मी होमसिक झालो होतो. माझ्या दोन लहान मुलांना तसेच आई, बाबा आणि बायकोला मी त्यांचा हक्काचा वेळ देऊ शकत नव्हतो. त्यामुळे, आता मला चांगला उसंत मिळाला असून, कुठे बाहेर जाण्यापेक्षा घरच्यांसोबत घरातच समर व्हेकेशनचा आनंद लुटण्याचा मी विचार केला आहे. मायरा आणि राघवसोबत खेळताना दिवस कधी जातो हे कळतसुद्धा नाही. शिवाय, त्यांच्यासोबत खेळताना मला सुद्धा लहान झाल्यासारखे वाटते... व्हेकेशन म्हणजे नेमके काय असते? नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण निवांत आणि मन प्रसन्न करण्यासाठी केलेली जाणारी कृतीच ना ! ती तर मी अशीदेखील करतो आहे !
पुढे वाचा, या सुट्टीत कसा आहे स्वप्नीलचा दिनक्रम... यासह बरंच काही...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.