आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Marathi Actor Vaibhav Mangale Birthday Celebration : हटके पद्धतीने सेलिब्रेट झाला वैभव मांगलेंचा B\'day, दिसले चेटकिणीच्या रुपात

Photos: हटके पद्धतीने सेलिब्रेट झाला वैभव मांगलेंचा B\'day, दिसले चेटकिणीच्या रुपात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता वैभव मांगले यांचा नुकताच हटके पद्धतीने वाढदिवस साजरा झाला. सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या  ‘अलबत्या गलबत्या’ या बालनाट्यात वैभव चेटकिणीची भूमिका वठवत आहेत. 21 जून रोजी मुंबईतील शिवाजी मंदिरात या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगानंतर संपूर्ण टीमने प्रेक्षकांसोबत मिळून वैभव यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी वैभव चेटकिणीच्या भूमिकेच्या गेटअपमध्ये होते. त्यांनी नाटकाची टीम आणि चिमुकल्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. नाटकाच्या प्रयोगावेळी वाढदिवस साजरा झाल्याचा आनंदही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 20 जून रोजी वैभव यांचा वाढदिवस होता. 

 

12 मे रोजी रंगभूमीवर दाखल झाले आहे हे नाटक... 

बाल रंगभूमीवर गाजलेले रत्नाकर मतकरी लिखित ‘अलबत्या गलबत्या’ हे बालनाट्य 12 मे रोजी पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल झाले आहे. अभिनेते, लेखक चिन्मय मांडलेकर याचे दिग्दर्शक आहेत. मुळ नाटकात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी गाजवलेली, घाबरवणाऱ्या चेटकीणीची भूमिका साकारली होती. आता हीच भूमिका वैभव मांगले करत आहेत. केवळ सुट्टीपुरतेच नाही, तर वर्षभर 'अलबत्या...'चे प्रयोग होणार आहेत. 

 

पाहुयात, वैभव मांगले यांच्या बर्थडे सेलिब्रेशनचे खास Photos...

बातम्या आणखी आहेत...