आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Unknown Facts: बँकेत नोकरीला होते अभिनेते विजय पाटकर, असे जुळले होते लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांनी 29 मे रोजी वयाची 57 वर्षे पूर्ण केली. 29 मे 1961 रोजी मुंबईत एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मुंबईतील गिरगाव येथे त्यांचे बालपण गेले. येथील युनियन हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर सिद्धार्थ कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. 


बँक ऑफ इंडियात नोकरीला होते विजय पाटकर...
विजय पाटकर यांनी अनेक वर्षे बँक ऑफ इंडियात नोकरी केली होती. लग्नानंतरही काही वर्षे त्यांनी नोकरी केली. पण अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी नोकरी सोडून पुर्णवेळ अभिनयाला द्यायचा निर्णय घेतला. 


1992 साली झाले लग्न...
अभिनेते विजय पाटकर यांचे अगदी  ठरवून लग्न झाले. विजय यांच्या पत्नीचे नाव सरोज आहे. या दोघांचा अगदी रितसर पाहण्याचा कार्यक्रम झाला होता. विजय यांच्या वडिलांच्या कार्यालयातील मित्रांनी त्यांच्यासाठी सरोज यांचे स्थळ आणले होते.  29 नोव्हेंबर 1992 रोजी हे विवाहबद्ध झाले. यांच्या लग्नाला  25 वर्षे झाली आहेत. 


पुढे वाचा, 
> लग्नाच्या 14 दिवसांपूर्वी झाला होता अपघात.. 
> एका मुलाचे वडील आहेत विजय पाटकर...
> 2006 मध्ये झाले होते आर्थिक नुकसान...
> नाटकातून सुरु झाले अभिनय करिअर... यासह बरंच काही...  

 

बातम्या आणखी आहेत...