आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री मयुरी देशमुखने अनाथ मुलांसोबत साजरा केला ख्रिसमस, जेनेलियासोबत व्हॅकेशनवर गेला रितेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आता केवळ हिंदीच नाही तर मराठी कलाकारही उत्सफुर्तपणे ख्रिसमस सेलिब्रेशन करतात. काल 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसनिमित्त अभिनेत्री मयुरी देशमुखने अनाथालयातील मुलांना भेट दिली आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला. मयुरीने या स्पेशल भेटीचे काही फोटो सोशल मीडियावरही शेअर केले आहेत. अभिनेता रितेश देशमुखही आता ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त व्हॅकेशन मुडमध्ये आहेत. या दोघांना त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यात ते दोघे सर्वांना हॅपी हॉलिडे असे म्हणत आहेत. 

 

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लग्नानंतर अजूनही व्हॅकेशनवर आहे. पतीसोबत सध्या हनीमून साजरा करणारी प्रार्थनाने न्युझीलंड येथे ख्रिसमस साजरा केला. अभिनेत्री मनवा नाईकनेही तिच्या लग्नानंतरचा पहिला ख्रिसमस पतीसोबत साजरा केला. मराठीतील दोन टॉप अभिनेत्री अमृता खानविलकर आणि सोनाली कुलकर्णी यांनीही फोटो शेअर करत लोकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मराठी कलाकारांच्या ख्रिसमस सेलिब्रेशनचे काही फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...