आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'महाराष्ट्राचा फेवरेट कोण\'मध्ये सईने पटकावले दोन पुरस्कार, पाहा मराठी कलाकारांची मांदियाळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  झी टॉकीज यांच्यातर्फे 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यात अभिनेत्री सई ताम्हणकरने दोन पुरस्कार पटकावले आहेत. विशेष म्हणजे सईला या पुरस्कारासाठी तीन विभागात नामांकने मिळाले होते. त्यात 'जाऊ द्या ना बाळासाहेब' या चित्रपटासाठी महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री, 'फॅमिली कट्टा' चित्रपटासाठी फेव्हरेट सहाय्यक अभिनेत्री आणि 'फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर' यासाठी तिला नामांकने होती. त्यातील 'फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर' आणि 'महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री' यासाठी तिला पुरस्कार मिळाले आहेत. 

 

तर मराठी चित्रपट 'फास्टर फेणे'ने तब्बल चार पुरस्कार जिंकले आहेत. त्यात बेस्ट फिल्म, बेस्ट डिरेक्टर, बेस्ट अॅक्टर आणि बेस्ट व्हिलनसाठी फास्टर फेणेने पुरस्कार जिंकल्याने संपूर्ण टीम आनंदात आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने सोशल मीडियावर फोटो शेअर करुन प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

 

या पुरस्कार सोहळ्याला मराठी चित्रपटविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. त्यात सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, मिथीला पालकर, सिद्धार्थ चांदेकर, शरद केळकर, अभिनय बेर्डे, प्रिया बापट यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कारसोहळ्याला उपस्थित कलाकारांचे फोटोज्...