आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर हलव्याच्या दागिन्यात नटली प्रार्थना तर \'राधिका\'चे दिसले गोजिरे रुप, पाहा कलाकारांचे सेलिब्रेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री प्रार्थना बेहेरे तिच्या लाँग हनीमूनवरुन परतली आहे. परतल्यावर प्रार्थनाने तिचा पहिलाच सणही साजरा केला. काळ्या साडीत आणि हलव्याच्या दागिन्यात नटलेली प्रार्थना फारच गोजिरी दिसत होती. तर दुसरीकडे आपल्या सर्वांची लाडकी राधिका अर्थात अनिता दाते केळकरनेही तिच्या हलव्याच्या दागिन्यातला फोटो इन्सटावर शेअर केला. 

 

मकर संक्रातीनिमित्त काही कलाकारांनी घरी तर काहींनी मालिकांच्या सेटवर वर्षाच्या पहिल्या सणाचे सेलिब्रेशन केले. मयुरी वाघने पती पियुषसोबत एक फोटो शेअर करत लोकांना शुभेच्छा दिल्या तर फुलपाखरु फेम अभिनेत्री ऋता दुर्गुलेनेही काळ्या साडीत फोटो शेअर केला. नकळत सारे घडले या मालिकेतील चिमुकली परीही हलव्याच्या दागिन्यात नटलेली दिसली. सोबतच मयुरी देशमुख, पल्लवी सुभाष यांनी घरच्यांसोबत सण साजरा केला.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मराठी कलाकारांचे मकर संक्रांती सेलिब्रेशन...

बातम्या आणखी आहेत...