आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी तरी येणार येणार गं... मावशी होणार आहे अमृता, थोरल्या बहिणीचे झाले डोहाळे जेवण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई गौरी, थोरली बहीण आदिती आणि वडील राजू यांच्यासोबत अमृता खानविलकर - Divya Marathi
आई गौरी, थोरली बहीण आदिती आणि वडील राजू यांच्यासोबत अमृता खानविलकर

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या घरी लवकरच नवीन पाहुणा येणार आहे. अमृताची थोरली बहीण आदिती खानविलकर-बक्षी हिच्याकडे गोड बातमी असून नुकतेच आदितीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. स्वतः अमृताने आईवडील आणि बहिणीसोबतचा डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील एक खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर करुन ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अमृताने या फोटोला कॅप्शन दिले, "#4+1 #happyfamily #babyshower #dohalejewan #aaji #aai #maushi #ajoba" आदिती ही अमृताची थोरली बहीण असून दीपक बक्षीसोबत ती विवाहबद्ध झाली आहे. आदिती एक एअर होस्टेस असून दुबईत स्थायिक आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, थोरल्या बहिणीच्या डोहाळे जेवणातील अमृताचा लूक...

बातम्या आणखी आहेत...