आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Women\'s Day Spl: \'घाडगे & सून\' फेम भाग्यश्री म्हणते, \'इतरांची ढाल बनायचं!\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक सामान्य तरुणींनी अभिनय क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. अशीच एक अभिनेत्री आहे भाग्यश्री लिमये. सामान्य कुटुंबातून असलेल्या भाग्यश्रीने 'घाडगे & सून' या मालिकेतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भाग्यश्री काय म्हणतेय जाणून घेऊयात तिच्याच शब्दांत...    

 

"मी मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. याचं कारण मला घरातून कधीही मुलगी आहे म्हणून दुय्यम वागणूक मिळाली नाही, उलट माझे सर्व लाड माझ्या आई बाबांनी पुरवले. आपली मुलगी जगात सक्षमतेनं वावरू शकली पाहिजे यासाठी योग्य ते शिक्षण दिले. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले उच्च शिक्षण घेऊनही मी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याच ठरवलं तेव्हाही बाबांनी मला सर्वार्थानी पाठींबा दिला म्हणून मी अभिनेत्री होण्याचं स्वप्न आज साकार करू शकले. मुलगी असो वा मुलगा दोघांनीही समाजात एक उत्तम नागरिक म्हणून नाव मिळवलं पाहिजे असे संस्कार माझ्या आईवडिलांनी आम्हा बहीणभावांवर केले."

 

भाग्यश्री पुढे म्हणते, "महिला दिनाच्या निमित्ताने मला सर्वांना असं सुचवावसं वाटतं की, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्याचबरोबर आम्ही मुली स्वतंत्र व्यक्तीमत्व आहोत. आम्हीही घराण्याचं नाव उज्ज्वल करू शकतो. आईवडिलांचा आधार होऊ शकतो. देशाची शान बनू शकतो. म्हणूनच मुलींनो... “स्त्री असल्याचा अभिमान बाळगा” जिजाऊ सावित्रीबाई, रमाबाई यांचा वारसा आपल्याला लाभला आहे. त्यामुळे आता फक्त आणि फक्त पुढे जायचं आणि इतरांसाठी ढाल बनायचं."

 

पुढील स्लाईड्सवर बघा, भाग्यश्रीची तिच्या कुटुंबीयांसोबतची निवडक छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...