आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day:दूरदर्शनवर काम करतांना नाटक, चित्रपटात या अभिनेत्रीने केले काम, वंदना गुप्ते आहे सख्खी बहीण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाची छाप उमटवणाऱ्या अभिनेत्री भारती आचरेकर आज त्यांचा 60वा वाढदिवस साजरा करत आहेत. प्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांचा वारसा त्यांना मिळाला आणि फार कमी जणांना माहीत आहे ती त्या अभिनयासोबत त्या उत्तम गायिकाही आहे. भारती आचरेकर यांचे लहानपण पुण्यात गेले. भारती आचरेकर यांना भावना प्रधान भूमिका करून प्रेक्षकांना रडवण्यापेक्षा दणदणीत संघर्षमय आणि विनोदी भूमिका करायला आवडते. मणिक वर्मा यांना त्यांनी अनेक कार्यक्रमांतून साथ केली. वयाच्या १० व्या वर्षी जेव्हा हातात तंबोरा धरताही येत नव्हता, तेव्हा पुण्यात तुळशीबागेत मणिक वर्मा यांच्या बरोबर पहिला कार्यक्रम केला. गाण्याचं बाळकडू घरातूनच मिळाले होते, मणिक वर्माच्या मागे बसून तिला साथ करणं, हा अनुभव त्यांना खूप काही शिकवून गेला. तिच्यामुळे त्यांना गाण्यातला आत्मविश्वास मिळाला. त्यांनी वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी खास माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 
 
त्यानंतर एस.एन.डी.टी. महाविद्यालयातून संगीत हा विषय घेऊन एम.ए. केले. अर्थात जवळजवळ २०-२२ वर्ष त्यांनी मणिक वर्मा यांच्याबरोबर अनेक ठिकाणी जाऊन कार्यक्रम केले. .भारती आचरेकर यांनी पूर्णवेळ गाणं करावं, असं अनेकांचं म्हणणं होतं. एकदा प्रसिद्ध नाटककार मो. ग. रांगणेकर यांनी त्यांचे गाणं ऐकलं आणि 'दि हिंदू गोवा असोसिएशन'च्या 'धन्य ती गायनी कळा' या नाटकासाठी विचारलं. या नाटकाला पं. भीमसेन जोशी यांचं संगीत होतं, तर नाटकात कृष्णराव चोणकर, रामदास कामत, श्रीपाद नेवरेकर अशी संगीतातली बडीबडी मंडळी काम करत होती. ते  भारती आचरेकर यांचे पहिले नाटक.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, आठ वर्षे दूरदर्शनवर केले आहे काम..
 
(संदर्भ - अशोक उजळंबकर  आणि संजीव वेलणकर, पुणे)
 
 
बातम्या आणखी आहेत...