आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INTERVIEW : छाया कदम सांगतात, \'न्यूड\'चे सीन शूट करताना आले होते दडपण, पण...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रवी जाधव यांचा बहुप्रतिक्षित आणि अनेक विवादांत अडकलेला 'न्यूड' चित्रपट आज (27 एप्रिल) रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे केवळ प्रेक्षकच नव्हे तर समीक्षकांनीही तोंडभरुन कौतुक केले आहे. न्यूड मॉडेलिंग यासारखा संवेदनशील विषय अतिशय चपखलपणे लोकांसमोर मांडण्यात रवी जाधव यशस्वी झाले आहेत. त्याचप्रमाणे चित्रपटातील मुख्य कलाकार छाया कदम आणि कल्याणी मुळे यासुद्धा त्यांच्या विलक्षण अभिनयाने प्रेक्षकांना स्त्ब्ध करुन सोडतात.

 

चित्रपटातील चंद्राक्का म्हणजेच छाया कदम यांनी divyamarathi.comशी बोलताना चित्रपटाच्या यशाचा आनंद व्यक्त केला आणि पडद्यामागील काही घडामोडीही सांगितल्या. त्यांच्याशी झालेली ही खास बातचीत आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

चित्रपटाचे यश आणि प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाल्यावर साहजिकच कसे वाटेत आहे, या प्रश्नावर छाया कदम म्हणाल्या, "आपल्या कामाचे कौतुक झालेले सर्वांनाच आवडते. कलाकार म्हणून वेगळ्या भूमिका करावेसे वाटणे, ही प्रत्येकाचीच इच्छा असते पण वाटणे आणि वाट्याला येणे दोन वेगळ्या गोष्टी असतात. न्यूड मॉडेलिंगसारख्या विषयावर एक संपूर्ण सिनेमा येणे आणि मला त्यात भूमिका मिळणे याबद्दल मी फारच आनंदी आहे. प्रेक्षकांना आपल्या वेगळ्या धाटणीचे काम पसंतीस पडत आहे आणि आता काम करण्याचा हुरुपही वाढला आहे."  

 

रवी जाधव दी ग्रेट..

रवी जाधव यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना छाया म्हणाल्या,"रवी जाधव जगासाठी खूप मोठा दिग्दर्शक आहे, खूप अनुभवी व्यक्ती आहे. पण जेव्हा तुम्ही त्याच्या संपर्कात येतात तेव्हा तो इतका साधा आणि जमिनीवर राहणारा माणूस आहे की, तो सर्वांना त्याच्या जगात सामावून घेतो आणि स्वतःला फार कम्फर्टेबल करतो. त्यामुळे आपण त्याचे वलय विसरुन जातो. पहिल्याच भेटीत तो अगदी आपलासा वाटायला लागतो. न्यूडसारखा संवेदनशील विषय जर दुसऱ्या कोणी दिग्दर्शकाने केला असता तर तो इतका समर्पक आणि न्यूड नाव असूनही अश्लीलतेकडे न झुकणारा बनवता आला असता की नाही याबद्दल मला शंका येते. खूप साध्या-सोप्या पद्धतीने कलाकारांकडून कसे काम करुन घ्यावे, याचा हातखंडा त्याला चांगलाच ठाऊक आहे. 'न्यूड' नाव असूनही रवीने भरजरी वस्त्रात लपेटून हा चित्रपट आपल्यासमोर येतो आणि त्याबद्दल रवीचे फार कौतुक करावेसे वाटते." 

 

अशी झाली चित्रपटासाठी निवड..

या चित्रपटाच्या निवडीबद्दल सांगताना छाया कदम म्हणाल्या, "दोन वर्षांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर फेसबुकवर पाहिले होते आणि त्याचवेळी अशा चित्रपटात आपल्याला भूमिका का नाही मिळाली असा मी विचार केला. ते पोस्टर पाहूनच मी फार प्रभावित झाले होते. पण हा चित्रपट पूर्ण झाला असे मला त्यावेळी वाटले होते. त्यानंतर काहीच दिवसांत  मला रवी जाधवचा फोन आला आणि 'न्यूड'विषयी विचारणा झाली आणि मी चित्रपटाची स्क्रिप्ट येण्याअगोदर त्यांना माझा होकार दिला." 

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, 'न्यूड'विषयी झालेल्या वादाबाबत काय म्हणाल्या छाया कदम...

बातम्या आणखी आहेत...