आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World : हेमांगी कवीचे छोट्या पडद्यावर कमबॅक, 'फुलपाखरु'मध्ये आहे ही भूमिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पावधीतच 'फुलपाखरू' या मालिकेने रसिकांची पसंती मिळाली आहे आणि या मालिकेने एक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करून लोकप्रियतेचे शिखर गाठले. मालिकेतील वैदेही म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे तमाम तरूणांच्या हृदयाची धडकन आहे तर मानस म्हणजेच यशोमन आपटे सगळ्या मुलींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कॉलेजच्या अल्लड वयात जुळलेलं प्रेम, त्यांचा एकमेकांवरचा लटका राग, त्यांची खोडकर मस्ती, थोडे रुसवे - फुगवे, एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या मानस आणि वैदेहीची ही प्रेमकथा म्हणजे 'फुलपाखरू'. या कार्यक्रमात प्रेक्षकांनी अनेक ट्विस्ट्स अँड टर्न्स अनुभवले. आता या मालिकेत एक नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी  फुलपाखरू या मालिकेत योग टीचर म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

चित्रपट नाटक आणि मालिका या तीन ही माध्यमात आपल्या अभिनयाने ठसा उमटविलेल्या हेमांगीने फुलपाखरू मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. हेमांगी या मालिकेत योग टीचरच्या भूमिकेत दिसणार आहे. हेमांगीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे त्यामुळे तिच्या या नवीन पात्राला देखील प्रेक्षक तितकंच प्रेम देतील यात शंकाच नाही.

 

छोट्या पडद्यावरील तिच्या पुनरागमनाबद्दल बोलताना हेमांगी म्हणाली, "माझ्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात छोट्या पडद्यावर झाली त्यामुळे मी या माध्यमात काम करण्यासाठी नेहमीच उत्साही असते. फुलपाखरूची संपूर्ण टीम खूप एनर्जेटिक आहे त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना देखील खूप मजा येते. प्रेक्षकांनी नेहमीच माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि या पुढेही माझ्या कामावर असंच प्रेम करतील याची मला खात्री आहे."

बातम्या आणखी आहेत...