आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interview : \'मीराची व्यक्तिरेखा ही खऱ्या आयुष्यातील खुशबूसारखीच आहे\', सांगतेय खुशबू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावर आम्ही दोघी ही मालिका नव्याने दाखल झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडे आणि शिवानी रंगोले मुख्य भूमिकेत झळकत आहे. या मालिकेत थोरली बहीण मीराची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री खुशबू तावडे हिच्याशी झालेली ही खास बातचित...

 

मीरा या तुझ्या पात्राविषयी काय सांगशील?

- मीरा सारखी शांत आणि सालस व्यक्तिरेखा साकारताना मला खूप छान वाटतंय. ती खूप लाजरी बुजरी आहे, ती जास्त बोलत नाही आणि प्रत्येक परिस्थितीनुसार ती स्वतःला अड्जस्ट करते. सशक्त कथानक असलेल्या मालिकेत काम करण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप आनंद आहे.

 

आम्ही दोघी मधील तुझ्या मीरा या पात्राशी तू किती रिलेट करते?
- मीराची व्यक्तिरेखा ही खऱ्या आयुष्यातील खुशबूसारखीच आहे. खऱ्या आयुष्यात मी स्वतः एक मोठी बहीण आहे ज्याची मला हे पात्र साकारताना खूप मदत झाली. मी मीराशी रिलेट करू शकते आणि तिची व्यक्तिरेखा खूप छानपणे समजू शकते.

 

पुढे वाचा, मुलाखतीचा उर्वरित भाग..

 

बातम्या आणखी आहेत...