आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos:मराठी अभिनेत्री कृतिका देव अडकली विवाहबंधनात, 6 जानेवारी रोजी बॉयफ्रेंडसोबत केले लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'राजवाडे अॅणड सन्स' फेम अभिनेत्री कृतिका देव विवाहबंधनात अडकली आहे. बॉयफ्रेंड आणि अभिनेता अभिषेक देशमुखसोबत कृतिकाने रजिस्ट मॅरेज केले आहे. मोडक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी जवळचे नातेवाईक, मित्रमैत्रीण उपस्थित होते. विशेष म्हणजे हे लग्न 6 जानेवारी रोजी पार पडले आहे पण कृतिका आणि अभिषेकने आज हे फोटो शेअर करत लग्नाची माहिती दिली आहे.

  

कृतिका आणि अभिषेकने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने लिहीले आहे की, लग्न.. 
६ जानेवारी २०१८..Thanks to Our Parents..Friends..Family..Well Wishers #happiness #register #wedding#smiles #love #love #love 

 

अभिनेत्री कृतिका देव मुळची पुण्याची आहे. एस.पी कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केले. प्राईम टाईम मालिकेत तिने काव्या आपटेची भूमिका केली होती. त्यानंतर तिने राजवाडे अॅण्ड सन्स, हॅपी जर्नी आणि हवाईजादा यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. 2017 साली तिने प्रेम हे या प्रथमेश परबसोबत काम केले. यात त्या दोघांची लहानवयात असणारी प्रेमकथा दाखवण्यात आली. 

 

कृतिकाचा पती अभिषेक देशमुख हा अभिनेता, दिग्दर्शक तसेच लेखकही आहे. त्याने पसंत आहे मुलगी या मालिकेत पुनर्वसूची भूमिका केली आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, कृतिका आणि अभिषेकचे काही खास PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...