आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रार्थना बेहरेनंतर आता ही फेमस अॅक्ट्रेस अडकली विवाहबंधनात, जाणून घ्या कोण आहे हिचा जोडीदार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अलीकडेच अनेक मराठी सेलिब्रिटींचे दोनाचे चार हात झाले. प्रार्थना बेहरे, रोहन गुजर, शशांक केतकर हे सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. आता या सेलिब्रिटींनंतर आणखी एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री बोहल्यावर चढली आहे. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री मधुरा देशपांडे हिच्याविषयी. ‘कन्यादान’, ‘इथेच टाका तंबू’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेल्या मधुराने तिचा मित्र आशय गोखलेसोबत सप्तपदी घेतल्या. 

 

जुने मित्र आहेत आशय आणि मधुरा... 
मधुराचा जोडीदार आशय हा मुळचा पुण्याचा असून तो व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. तसेच, ‘रिबन्स अॅण्ड बलून्स’मध्येही तो पार्टनर म्हणून कार्यरत आहे. आशय आणि मधुरा हे फॅमिली फ्रेंड्स आहेत त्यामुळे एकमेकांना ते चांगलेच ओळखतात. एका मुलाखतीत मधुराने आशयबद्दल सांगितले, की "आशय आणि मी एकमेकांना खूप चांगले ओळखतो. आमचा स्वभाव एकमेकांपेक्षा खूप वेगळा असला तरी आम्ही एकमेकांना पुरक आहोत असे मला जाणवले आणि मी लग्नाचा निर्णय घेतला. आशयची फॅमिलीही माझ्या करिअरला प्राधान्य देते त्यामुळे मी खूप समाधानी आहे."

 

गेल्यावर्षी झाला होता साखरपुडा...
मधुरा आणि अक्षय यांनी गेल्यावर्षी 5 ऑक्टोबर रोजी साखरपुडा केला होता. त्यानंतर दोघांनी नवीन वर्षात आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. मधुरा आणि आशयच्या जवळच्या मित्रांनी त्यांच्या लग्नाचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नात मधुराने पिवळ्या रंगाची काठापदराची साडी नेसली असून नववधुच्या रुपात ती अतिशय सुरेख दिसतेय. तर आशय बंद गळ्याच्या शेरवानीत शोभून दिसतोय. 


बघुयात, मधुरा आणि आशय यांच्या लग्नाचे आणि साखरपुड्याचे काही निवडक फोटोज...