आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Acting पासून ब्रेक घेत आता संसारात रमली आहे मृणाल दुसानिस, फॅन्सना केले \'हे\' प्रॉमिस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने याच महिन्यात म्हणजे 20 जून रोजी वयाची 30 वर्षे पूर्ण केली आहेत. 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा करणा-या मृणालने थोड्या काळासाठी अभिनयापासून विश्रांती घेतली आहे. यामागचे कारण अलीकडेच तिने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबत शेअर केले आहे. काय म्हणाली मृणाल जाणून घ्या...


संसारात रमली आहे मृणाल...
दोन वर्षांपूर्वी मृणालचे लग्न पुण्याच्या नीरज मोरे सोबत झाले. नीरज नोकरीनिमित्ताने अमेरिकेत स्थायिक आहे. या दोघांचे हे अरेंज मॅरेज आहे. 25 फेब्रुवारी 2016 रोजी लग्न झाल्यानंतर अवघ्या 20 दिवसांनी मृणाल शूटिंग सेटवर परतली होती. त्यावेळी मृणाल कलर्स वाहिनीच्या ‘असं सासर सुरेख बाई’ या मालिकेत  मेन लीड साकारत होती.  डेलीसोप असल्याने मृणालला लग्नानंतर फार काळ सुट्टी  घेता आली नव्हती. पण लग्नानंतर काही काळ मालिकेत काम केल्यानंतर मृणालने अमेरिकेत नव-याकडे जाण्याचे ठरवले आणि मालिकेतून ब्रेक घेतला. आता मृणाल पती नीरज मोरेसोबत अमेरिकेत स्थायिक झाली आहे. 


सर्वसामान्य मुलींप्रमाणे जगतेय आयुष्य... 
फेसबुक लाइव्हमध्ये मृणालने सांगितले, मी आता लग्नानंतर एका सर्वसामान्य मुलीप्रमाणे आयुष्य जगतेय. नीरजसोबत भरपूर एन्जॉय करतेय. आम्ही फिल्म्स बघतो. नीरजसाठी मी वेगवेगळ्या डिशेज बनवते. हा वेळ मी स्वतःला दिला आहे. याकाळात मी भरपूर पुस्तकं वाचतेयं. अमेरिकेत आल्यानंतर स्नो फॉल बघायची माझी इच्छा होती. तीदेखील पुर्ण झाली आहे. 


चाहत्यांना केले प्रॉमिस...
मृणालचे चाहते तिच्या कमबॅकची आतुरतेने वाट बघत आहे. आपल्या चाहत्यांना मृणालने एक प्रॉमिस केले आहे. ते म्हणजे पुढच्या काही महिन्यात ती अभिनयात पुनरागमन करणार आहे. एका चांगल्या प्रोजेक्टच्या प्रतिक्षेत असून मालिका, नाटक किंवा चित्रपट कुठल्याही माध्यमातून कमबॅक करण्याची तयारी असल्याचे मृणालने आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, अमेरिकेत नव-यासोबत एन्जॉय करतानाची मृणालची छायाचित्रे आणि सोबतच वाचा, कसे जुळले दोघांचे लग्न... 

 

बातम्या आणखी आहेत...