आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7th Death Anni: या प्रसिद्ध अभिनेत्रीचे कॅन्सरमुळे झाले होते निधन, कमी वयातच घेतला जगाचा निरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः 'प्रपंच' ही मालिका असो, 'खबरदार' हा सिनेमा असो किंवा 'व्हाईट लिली नाईट रायडर'सारखं नाटक… दिवंगत अभिनेत्री रसिका जोशीच्या अभिनयाचं नाणं खणखणीतच वाजायचं. मराठीतल्या या गुणी अभिनेत्रीनं 7 जुलै 2011 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. कॅन्सरमुळे वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी रसिका जोशीचं निधन झाले. आज तिचा सातवा स्मृतीदिन आहे. मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतसुद्धा रसिका जोशी हे प्रसिद्ध नाव होतं. हिंदीतील मालामाल विकली, गायब, ढोल, भुलभुलैय्या या कॉमेडी सिनेमांसोबतच एक हसीना थी, वास्तुशास्त्र या गंभीर सिनेमांमधील भूमिकांचे रसिका जोशीनं सोनं केलं.   

 

 पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, रसिकाची आठवणीतील छायाचित्रे आणि सोबतच जाणून घ्या तिच्याविषयी बरंच काही...  

बातम्या आणखी आहेत...