आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील दुर्दशेमुळं रेणुका शहाणे अस्वस्थ, म्हणाल्या, \'मुंबईकडून फक्त घेतलं जातं...\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकात आज (3 जुलै) पादचारी पूल कोसळला. पावसामुळे अनेक ठिकाणच्या वाहतुकीची दैना उडाली. मुंबईकरांचे मोठे हाल झाले. यावर सामाजिक प्रश्नांबद्दल नेहमीच जागरूक असणा-या आणि विविध विषयांवर आपली मते ठामपणे मांडणा-या अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी चिंता व्यक्त केली आहे. मुंबईकडून फक्त घेतले जाते. लोकसंख्येच्या तुलनेत मुंबईला फारच कमी परत मिळते, असे रेणुका यांनी म्हटले आहे. 

 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना रेणुका म्हणाल्या, 'ही नैसर्गिक आपत्ती नव्हती. टाळता येण्यासारखी दुर्घटना होती. मुंबईकरांमध्ये स्पिरीट आहेच, आहे त्या परिस्थितीत मुंबईकर पुढे जात राहतात. अर्थात, त्यांना दुसरा पर्यायही नसतो. मात्र, मुंबईकरांच्या स्पिरीटच्या मागे लपून प्रशासकीय यंत्रणा आपली जबाबदारी झटकतात हे जास्त भयंकर आहे,' असे रेणुका म्हणाल्या. 

 

बातम्या आणखी आहेत...