आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'आमच्या काही फालतू अपेक्षा आहेत', या मराठी अभिनेत्रीने सांगितले कास्टींग काऊचचे उघड वास्तव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सगळीकडे कास्टींग काऊच प्रकरणाबाबत चर्चा ऐकायला मिळत आहेत. मराठी असो अथवा हिंदी इंडस्ट्री सर्वच क्षेत्रातील महिला याबाबत पुढे येऊन त्यांना आलेल्या अनुभवाबद्दल सांगताना दिसत आहेत. राधिका, उषा जाधव इतकेच नव्हे तर अलका कुबलपर्यंत अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेल्या गोष्टी उघडपणे मांडल्या. आता त्याच अजून एका अभिनेत्रीची एंट्री झाली आहे ती म्हणजे रेश्मा रामचंद्र. 

 

'तुझ माझ ब्रेकअप' या मालिकेत सध्या काम करत असलेली रेश्मा रामचंद्रने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात आलेला अनुभव सांगितला. 2016 साली एका चित्रपटातील भूमिकेसाठी ऑडिशन दिल्यानंतर तिची निवड ठरली पण त्यानंतर पुणे येथे मैत्रिणीकडे गेल्यावर तिला या चित्रपटात काम करायचे असेल तर आमच्या काही फालतू अपेक्षा आहेत असे तिला सांगण्यात आले. 

 

यानंतर रेश्माने या चित्रपटासंबंधी तिची ज्यांच्याशी बोलणी सुरु होती त्यांना फोन करुन घटना सांगितली आणि त्यांनी तिला सदर माणलासा जाब विचारण्याचे आश्वासन दिले. यानंतर काही दिवसांनी त्याच व्यक्तीने फोन करुन तारीखा मॅच होत नसल्याने तुला या चित्रपटात घेऊ शकत नाही असा फोन केला आणि त्यानंतर  त्याने तुला काय करायचे ते कर अशी धमकीही तिला दिली. यानंतर रेश्माने तो प्रोजेक्ट सोडला तो चित्रपट आता रिलीज झाला आहे त्यामुळे त्या चित्रपटाशी संबंधित लोकांची माहिती देणे तिने टाळले.

 

 याबाबत नंतर रेश्माने सांगितले की, "मी हे प्रकरण जेव्हा सर्वांसमोर उघडपणे बोलली त्यामुळे मलाच टोमणे सहन करावे लागले. काहीजणांना माझ्यावर पब्लिसीटी स्टंट म्हणत आरोप केले पण त्यावेळी माझ्या बाजुने उभे राहणाऱ्या लोकांचे मी आभार मानले."
 
 रेश्मा रामचंद्रने याअगोदरही तिच्यासोबत झालेले कास्टींग काऊच प्रकरण उघडकीस आणले होते पण इंडस्ट्रीत फारशी ओळख नसल्याने रेश्माची दखल फारशी घेतली गेली नव्हती. रेश्माने 'तुझं माझं ब्रेक अप' मालिकेअगोदर 'देहभान', 'ठष्ठ' अशा नाटकांतही भूमिका केल्या आहेत. 
 
 एक अभिनेत्री म्हणून आतापर्यंतचा प्रवास सांगतांना रेश्मा म्हणजे "त्या प्रकरणानंतर मला तशाप्रकारचा वाईट अनुभव आला नाही, मला माझे काम पाहून भूमिका देणारे लोकही भेटले आहेत आणि आतापर्यंत मी जे काही केले यावर मला सार्थ अभिमानही आहे. केवळ कास्टींग काऊचला विरोध केला म्हणून आता काम मिळणार नाही असा विचार कधीच केला नाही आणि आतापर्यंत सर्व जबाबदारी निभावल्याचा आनंद आहे", असेच रेश्मा सांगते.
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, अभिनेत्री रेश्मा रामचंद्रचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...