आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day: या अॅक्ट्रेसचे अद्याप झाले नाही लग्न, मराठीसोबतच हिंदीतही केले आहे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'का रे दुरावा' ही छोट्या पडद्यावर गाजलेली मालिका नक्कीच तुम्हाला आठवत असेल. या मालिकेत सुयश टिळक आणि सुरुची अडारकर यांच्यासह एका खास व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. ही व्यक्तिरेखा म्हणजे शोभा. सुयश आणि सुरुची यांच्या प्रेमात मिठाच्या खड्याचे काम शोभा या व्यक्तिरेखेने केले होते. ही भूमिका अभिनेत्री शीतल क्षीरसागर हिने साकारली होती. या व्यक्तिरेखेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री शीतल क्षीरसागर हिचा आज वाढदिवस आहे. शीतल हे मराठी रंगभूमी आणि टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध नाव आहे. 

 

'का रे दुरावा'मुळे पोहोचली घराघरांत... 
'का रे दुरावा' या मालिकेत शीतलने साकारलेली भूमिका ही ग्रे शेडची होती. शोभा या व्यक्तिरेखेमुळे मला नव्याने ओळख प्राप्त झाली, असे शीतल सांगते. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत शीतल म्हणाली होती, "जेव्हा ही मालिका माझ्याकडे आली, तेव्हा मालिकेत नकारात्मक भूमिका आहे का? असा प्रश्न मी माझ्या टीमला विचारला होता. कारण ब-याच काळापासून ग्रे शेडची भूमिका साकारण्याची माझी इच्छा होती. 'का रे दुरावा'च्या माध्यमातून ती इच्छा पूर्ण झाली. शोभा म्हणून प्रेक्षकांनीच मला वेगळी ओळख निर्माण करुन दिली. इंडस्ट्रीतील लोकांना मी गेले दिवस काय करतेय, हे ठाऊक नव्हते. मात्र शोभा या व्यक्तिरेखेमुळे मी माझ्या इंडस्ट्रीतील लोकांपर्यंत पुन्हा नव्याने पोहोचले."

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घेऊयात, शीतलविषयी बरंच काही... 

बातम्या आणखी आहेत...