आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interview : या अॅक्ट्रेसला नाही थोरली बहीण, 'आम्ही दोघी' मालिकेमुळे ही इच्छा झाली पूर्ण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावर आम्ही दोघी ही मालिका नव्याने दाखल झाली आहे. या मालिकेत शिवानी रंगोले महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहे. मालिकेच्या निमित्ताने शिवानीसोबत मारलेल्या या खास गप्पा.. 

 

आम्ही दोघी मधील तुझ्या मधुरा या पात्राशी तू किती रिलेट करते?

मधुराच पात्र हे खूपच पॉसिटीव्ह आणि बिनधास्त आहे. मला नेहमीच असे एनर्जेटिक कॅरेक्टर्स साकारायला आवडतात जे प्रेक्षकांचे मनोरंजन करतील आणि त्यांच्या मूड लाईट करतील. मधुराला स्वतःची मतं आहेत आणि ती खूप प्रॅक्टिकल मुलगी आहे. मी खऱ्या आयुष्यात देखील मधुरा सारखीच आहे.

 

मधुरा या तुझ्या पात्राविषयी काय सांगशील?

मधुरा देशमुख ही इंटिरियर डिझायनर आहे. ती स्वतःच कुटुंब म्हणजे तिची मोठी बहीण मीरा आणि तिचा मामा यांच्याबद्दल अतिशय पझेसिव्ह आहे. तिला लग्नाची घाई नाही आहे तसेच ती अरेंज मॅरेजमध्ये विश्वास ठेवत नाही. ती खऱ्या अर्थाने आजच्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करते आणि चालत आलेल्या रूढी व पारंपरिक गोष्टींबद्दल असलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी ती निडरपणे प्रश्न विचारते.

 

तुझं तुझ्या ऑनस्क्रिन बहिणीसोबत म्हणजेच सहअभिनेत्री खुशबू सोबत ऑनस्क्रिन आणि ऑफ स्क्रिन बॉण्डिंग कसं आहे?

आम्ही दोघी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. पण शूटींगच्या पहिल्याच दिवशी एकमेकांना भेटून आम्हाला असं वाटलं कि आम्ही खूप आधी पासून एकमेकांना ओळखतो. आम्ही एकमेकींना स्वतःचे सीन्स सुधारण्यासाठी मदत करतो. जसं ऑनस्क्रीन मधुरा आणि मीराचं नातं आहे तसेच आम्ही ऑफस्क्रिन एकमेकींना सांभाळून घेतो. मधुरा नेहमीच तिच्या बहिणीला प्रोटेक्ट करते आणि तिला धाडसी बनायचा वेळोवेळी सल्ला देते. मधुराला अजिबात आवडत नाही जेव्हा तिच्या बहिणीला कोणी दुखावतं आणि तिची बहीण गप्पपणे सगळं सहन करते.

 

झी युवावरील आम्ही दोघी या मालिकेचा हिस्सा होऊन कसं वाटतंय?

मी याआधी देखील झी युवावरील लोकप्रिय ‘बन मस्का’ या मालिकेत मैत्रेयीचं पात्र साकारलं आहे. त्यामुळे या वाहिनीसोबत माझं असोसिएशन जुनं आहे आणि 'नवे पर्व युवा सर्व' या धोरणाला धरून ही वाहिनी युथफूल कॉन्टेन्टने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. अशा पॉसिटीव्ह टीम सोबत करताना मला खूप छान वाटतंय. आम्ही दोघी या मालिकेद्वारे उमेश नामजोशी सारख्या नामवंत दिग्दर्शक ज्यांचं मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये मोलाचं योगदान आहे त्यांच्या सोबत काम करण्याची सुवर्णसंधी मला मिळाली. सतीश पुळेकर, वर्षा दांदळे, विवेक सांगळे हे माझे सहकलाकार खूप सपोर्टिव्ह आहेत आणि त्यांच्या कोऑपरेटिव्ह स्वभावामुळे सेटवरील वातावरण नेहमीच हलकंफुलकं राहतं.

 

पुढे वाचा, आणखी काय म्हणाली शिवानी...

बातम्या आणखी आहेत...