आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाली कुलकर्णीला लागलेत लग्नाचे वेध! परफेक्ट वेडींगसाठी या \'अप्सरे\'ची आहे अशी अट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या लग्नसराईचा सीझन आहे आणि अनेक मराठी कलाकार लग्नगाठीत अडकत आहेत. अशातच मराठी इंडस्ट्रीची अप्सरा सोनाली कुलकर्णीकडे फॅन्सची नजर नाही वळली तर नवलच. सोनाली कुलकर्णीनेही ती लवकरच लग्नगाठीत अडकण्यास उत्सुक आहे असे तिने सांगितले पण त्यासाठी मात्र तिची एक अट आहे. सोनालीची काय आहे ती खास अट..

 

सोनालीला हवे आलिशान राजेशाही थाटात लग्न...
सोनालीने तिच्या लग्नाविषयी विचारल्यावर सांगितले की, "मराठी इंडस्ट्रीतील अनेकजणांची लग्न झाल्याने मला मी कधी लग्न करतेय असे सर्वचजण विचारत आहेत. मीसुद्धा सिंगल असून आता मिंगल होण्यासाठी सज्ज आहे आणि लवकरच लग्नाचा निर्णय घेऊ शकते. मला माझे लग्न हे विराट-अनुष्काप्रमाणे राजेशाही थाटात व्हावे असे वाटते."

 

सिंगल असल्याचे सांगते सोनाली कुलकर्णी...
सोनाली कुलकर्णी अशी एक अभिनेत्री आहे जिचे नाव कधीच कोणत्या कलाकारासोबत जोडण्यात आले नाही. नेहमीच सिंगल या स्टेटसमध्ये राहणारी सोनालीने ती सिंगल असल्याचे जाहीर केले आहे. आता सोनाली कुलकर्णीने लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर ते मराठी इंडस्ट्रीतील एक राजेशाही वेडींग असल्यास नवल वाटायला नको. 

 

सोनालीने नुकतेच केले आहे नववधूच्या रुपातले फोटोशूट...
नुकतेच सोनालीचे नववधूच्या रुपातील काही फोटोज समोर आले आहेत. लहेंगा-चोली आणि बांधणीच्या ओढणीत सोनाली अतिशय सुंदर दिसत आहे. हे फोटोज सोनालीच्या नवीन फोटोशूटमधील असून प्रसिद्ध फोटोग्राफर भरत पवार यांनी तिचे हे मनमोहक रुप आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. तर विनोद सरोदे यांनी सोनालीचा मेकअप केला आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सोनालीने नुकतेच केलेले राजेशाही थाटातले फोटोशूट...

बातम्या आणखी आहेत...