आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री 3 वाजता झालेल्या बर्थ डे सेलिब्रेशनने भावूक झाल्या सुकन्या मोने, पाहा कुणी दिले Surprise

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठीतील नामवंत अभिनेत्री सुकन्या मोने यांनी नुकताच त्यांचा 49वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाला सुकन्या मोने यांना त्यांच्या मुलीकडून खास सरप्राईज मिळाले. सुकन्या मोने यांच्या मुलीने त्यांना केक, फुल आणि पत्र लिहून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. रात्री 3 वाजता झालेल्या या बर्थ डे सेलिब्रेशनने सुकन्या मोने यांना भरुन आले. त्यांनी त्यांच्या मुलीला या सरप्राईजबद्दल धन्यवाद दिले. 

 

सुकन्या मोने यांच्या मुलीचे नाव जुलिया मोने आहे. ती सध्या शिक्षण घेत आहे, सुकन्या मोने हे अलिबागहून शूटवरुन परत येतांना त्यांच्याबरोबर असलेल्या कलावंतांनीही सुकन्या यांचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर घरी पोहोचल्यावर सुकन्या यांच्या मुलीने त्यांच्यासाठी खास सेलिब्रेशन केले. या सर्व सेलिब्रेशनचे फोटो सुकन्या मोने यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मुलीने दिलेले सरप्राईज पाहून त्यांनी लिहीले की, "आज surprise वर surprise.....आत्ता 3 वाजता अलिबाग हून घरी आले तर माझ्या जुलिया ने माझ्यासाठी केक ,पत्र ठेवले होते आणि ती स्वतः इतक्या वेळ जागी होती 'माझ्यासाठी'...बस ह्यापपेक्षा कुठलंच gift मोलाचं असू शकत नाही...अजून काय हवंय मला......मोठ्ठ झालं माझं बाळ.....देवाचे किती उपकार मानू की मला जुलिया सारख रत्न दिल,कोहिनूर हिरा....आणि जिवाभावाची मैत्रीण दिली.......जुलिया"❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सुकन्या मोने यांनी शेअर केलेले त्यांच्या वाढदिवसाचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...