आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'या\' मराठी अभिनेत्रीला राजस्थानी निर्मात्याने 3 महिने केले होते कैद, बाळासाहेबांच्या मदतीने झाली सुटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठीतील प्रसिद्ध कॉमेडियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रिया पाठारे आज त्यांचा 46वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या कॉमिक टायमिंगने नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या सुप्रिया यांच्यावर एक वेळ अशी ओढविली होती की त्यांना त्यातून निघणे मुश्किल झाले होते. एका राजस्थानी चित्रपट निर्मात्याने चक्क त्यांना एका खोलीत डांबून ठेवले होते. त्या निर्मात्यापासून सुप्रिया यांनी कशीबशी त्यांची सुटका करुन घेतली होती. आज सुप्रिया यांच्या वाढदिवसानिमित्त हे संपूर्ण प्रकरण नेमके काय घडले होते याबद्दल माहिती घेऊन आलो आहोत.

 

1995 सालाची आहे गोष्ट..
टीव्ही अभिनेत्री सुप्रिया पाठारेने राजस्थान येथील चित्रपट निर्मात्यावर डांबून ठेवल्याचे आरोप लावले. एक-दोन नव्हे तब्बल तीन महिने सुप्रिया पाठारे त्या निर्मात्याच्या तावडीत अडकल्या होत्या. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्तक्षेपानंतर सुप्रिया त्या निर्मात्याच्या जाचातून सुटल्या होत्या. 

 

सुप्रिया यांनी एका कार्यक्रमात सांगितली आपबीती..
याबद्दल एका मुलाखतीत सुप्रिया यांनी सांगितले होते की, राजस्थान येथे एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते आणि त्यादरम्यान त्या चित्रपट निर्मात्याने सुप्रिया यांना धोक्यात ठेवले आणि 3 महिने बंधक बनवले. सुप्रिया यांनी यावेळी जागा आणि निर्मात्याचे नाव सांगण्यास नकार दिला. सुप्रिया यांनी सांगितले की, शूटिंगदरम्यान त्या राजस्थान येथे एकट्या होत्या आणि त्यांना बंदुकीचा धाक दाखवून बंदीस्त केले. 3 महिने सुप्रिया यांना केवळ त्यांच्या घरातीसल सदस्यांबरोबर बोलण्याची मुभा होती. पण घरच्यांशी बोलतानाही केवळ हिंदीतच बोलायचे अशी सूचना त्या निर्मात्याने दिली होती तरीही कसेबसे आपण बंधक बनलो आहोत अशी माहिती सुप्रिया त्यांच्या घरी बहिणीला सांगण्यात यशस्वी ठरल्या. यानंतर घरातील सर्व सदस्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदत मागितली आणि त्यांच्या मदतीने सुप्रिया पुन्हा महाराष्ट्रात परतण्यास यशस्वी ठरल्या. 

 

बंधक बनवण्याचे कारण सांगितले नाही...
बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार राजस्थान पोलिसांनी सुप्रिया पाठारे यांना शोधून काढले आणि त्यानंतर 20 तासाचा प्रवास करुन सुप्रिया सूरतला पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त 12 रुपये शिल्लक होते. सुप्रिया पाठारे यांनी त्या निर्मात्याने का बंधक बनवले होते ते सांगण्यासही नकार दिला. 

 

या मालिका-चित्रपटात केले आहे काम..

सुप्रिया पाठारे यांनी दिली सुपारी बायकोची (2008), फक्त लढ म्हणा (2011), करु या कायद्याची बात (2011), बालक पालक (2012), टाइमपास (2014), टाइमपास (2015), चि. व चि. सौ. का (2017) या चित्रपटांमध्ये  महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मराठीतील फु बाई फु, जागो मोहन प्यारे यांसारख्या लोकप्रिय मालिकेत त्यांनी काम  केले आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा सुप्रिया पाठारे यांचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...