आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - आज मराठी प्रेक्षकांची लाडकी अंजली म्हणजेच सुरुची अडारकर तिचा 30वा वाढदिवस साजरा करत आहे. पहचान या डीडी1 वरील मालिकेमधून अभिनयास सुरुवात करणारी सुरुचीला 'का रे दुरावा' या मालिकेतून जास्त लोकप्रियता मिळाली. सध्या अंजली या मालिकेत डॉक्टरच्या भूमिकेतून सुरुची सर्वांची मने जिंकत आहे. मुळची ठाण्याची आहे सुरुची..
सुरुचीचा जन्म 25 एप्रिल 1988 साली ठाण्यात येथे झाला. जन्म आणि ठाणे येथे सर्व शिक्षण झालेल्या सुरुची अभिनयात तरबेज आहेच पण शिक्षणातही ती पुढे होती. तिने सरस्वती विद्यालय येथून तिने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने वझे-केळकर कॉलेजमधून इंग्लिश लिटरेचरचे शिक्षण घेतले. केवळ अभिनयातच नाही तर खेळातही सुरुची अग्रेसर होती. शाळेत असताना ती एक उत्तम व्हॉलीबॉल प्लेयर होती.
नॉन फिल्मी बॅकग्राऊंडची आहे सुरुची..
सुरुचीचे वडील लॉ कॉलेजचे प्रोफेसर आहेत तर आई गृहिणी आहे. सुरुचीला एक लहान भाऊही आहे त्याचे नाव सिद्धेश आहे आणि तो इंजिनीअर आहे.
मराठी तसेच हिंदीतही केले आहे काम...
सुरुचीने 2007 साली अवघा रंग एकची झाला या नाटकातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. या नाटकाचे दिग्दर्शन प्रभाकर पणशीकर यांनी केले होते. सुरुचीने 'का रे दुरावा', 'आपल बुआ अस आहे', 'ओळख', 'एक तास भुताचा', 'पहचान' यांसारख्या मालिाकंत काम केले आहे.
अरिजीत सिंग आहे सुरुचीला अत्यंत प्रिय..
एका मुलाखतीत सुरुचीला तिला तिच्या क्रशबद्दल विचारले असता तिने अरिजीत सिंह असे उत्तर दिले होते. सुरुचीला अरिजीतची गाणी खूप आवडतात आणि त्याची ती खूप मोठी चाहती आहे. आज सुरुचीचा वाढदिवस आहे आणि विशेष म्हणजे आज तिचा क्रश अरिजीत सिंहचाही वाढदिवस आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, सुरुची अडारकरचे काही खास फोटोज्...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.