आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : 'चला हवा येऊ द्या' फेम तुषारची पत्नी आहे अॅक्ट्रेस, संघर्षातून वाट काढत असा झाला या कपलचा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंकू, कळत नकळत, पारिजात, वादळवाट, विवाहबंधन, फु बाई फु, पुढचं पाऊल यांसह अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे स्वाती देवल. आज स्वातीचा वाढदिवस असून ती 'चला हवा येऊ द्या' या गाजत असलेल्या शोमध्ये संगीत संयोजकाची भूमिका पार पडत असेलला तुषार देवलची पत्नी आहे. स्वाती आणि तुषार यांचे लव्ह मॅरेज. 2003 मध्ये हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. पण लग्नानंतरचा यांचा इथवरचा प्रवास हा काही सोपा नव्हता. अनेक खाचखळगे पार पाडत दोन वर्षांपूर्वीच स्वाती आणि तुषार यांचे मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे. बोरिवलीत थ्री बीएचके फ्लॅट त्यांनी खरेदी केला.


divyamarathi.com ला दिलेल्या मुलाखतीत स्वातीने तिचा आणि तुषारचा संघर्षाचा काळ कसा होता, तुषार यशस्वी संगीतकार कसा झाला, याबद्दल सांगितले होते. चला तर मग आज स्वातीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात या कपलच्या प्रवासाविषयी.. 

 

लग्नानंतर डोंबिवलीत सुरु झाला संसार... 
स्वातीने सांगितले,  "तुषार आणि माझे बालपण अगदी छोट्या घरात गेले. मी वनरुम किचन संस्कृतीत वाढले, तर तुषार डोंबिवलीत भाड्याच्या घरात लहानाचा मोठा झाला. आम्ही दोघेही डोंबिवलीचे. 26 ऑक्टोबर 2003 रोजी तुषार आणि माझे लव्ह कम अरेंज मॅरेज झाले. लग्नानंतर डोंबिवलीतच सासरच्या घरापासून अगदी काही अंतरावर आम्ही दोघेच राहात होतो. वन रुम किचनपासून आमच्या संसाराला सुरुवात झाली. तो आमचा अतिशय संघर्षाचा काळ होता. कामासाठी डोंबिवली-मुंबई असा दररोज प्रवास करावा लागत असे. त्याकाळात मी व्यावसायिक नाटकांमधून काम सुरु ठेवले होते. तर तुषारची संगीत क्षेत्रात स्वतःचे नाव करण्याची धडपड सुरु होती. तुषार आपली वाद्ये घेऊन दररोज डोंबिवली-मुंबई असा प्रवास करायचा.''

 

दहीसरचे घर ठरले लकी...  
''एक दिवस लोकलमधून उतरताना तुषारची वाद्ये खाली पडली आणि त्याचदिवशी आम्ही ठरवले, की ज्या वाद्यांवर आपले एवढे प्रेम आहे, त्याची हेळसांड होऊ द्यायची नसेल, तर आपण डोंबिवली सोडून मुंबईत राहायला जावे. डोंबिवलीत दोन वर्षे भाड्याच्या घरात काढल्यानंतर आम्ही मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. मुंबईत पुन्हा भाड्याच्या घरातच राहण्याची वेळ आमच्यावर आली होती. कारण कामात फारशी ग्रोथ झाली नव्हती. त्यामुळे मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे केवळ स्वप्नच त्याकाळात आम्ही बघत होते. मुंबईत आल्यामुळे ट्रॅव्हलिंगचा बराच वेळ आमचा वाचला. काम शोधायला सोपे गेले. हळूहळू पैसे साठवत आम्ही २००७ साली दहीसरला स्वतःचा वन बीचएके फ्लॅट खरेदी केला. खरं सांगायचं, घर भाड्याचे असो वा स्वतःचे.. घराच्या बाबतीत मी खूप लकी ठरले आहे. पाणी, वारा, सूर्यप्रकाश, एका सुंदर घरासाठी ज्या कल्पना आपण करत असतो, अगदी तसेच घर आम्हाला मिळाले. आम्ही दहीसरच्या घरात आम्ही आठ वर्षे काढली. हे घर आमच्यासाठी खूप लकी ठरले. कारण येथे आल्यानंतर मराठीतच नव्हे तर हिंदीत मला काम मिळाले. मिसेस तेंडुलकर ही मालिका गाजली. शिवाय पारिजात, विवाहबंधन या मालिका मिळाल्या. या घरात असतानाच आम्ही स्वतःची मोठी गाडी घेतली. तुषार संगीतकार म्हणून नावारुपास आला. घडलंय बिघडलंय, इंडियाज बेस्ट ड्रामेबाज, रणवीर कॅफे, हास्यसम्राट अशा अनेक शोजसाठी त्याने संगीत संयोजक म्हणून भूमिका बजावली.''

 

पुढे वाचा, बाळ येणार तर ते स्वतःच्याच घरी घेतला होता निर्णय...