आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day:नक्षत्राप्रमाणे सुंदर आहे ही मराठमोळी अभिनेत्री, घेतले आहे वकिलीचे शिक्षण, पाहा Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'एफयु' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री वैदेही परशुरामी आज तिचा 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. कमी वयातच वैदेहीने तिची स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. 1 फेब्रुवारी 1992 साली मुंबईत जन्मलेल्या वैदेहीचे लहानपण आणि शालेय शिक्षण मुंबईतच गेले आहे. फार कमी लोकांना माहीत आहे की वैदेहीने वकिलीचेही शिक्षण घेतले आहे. न्यु लॉ कॉलेज मुंबई येथून वैदेहीने एल.एल.बीचे शिक्षण घेतले आहे. आज वैदेहीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याविषयीच्या काही खास गोष्टी..

 

वैदेहीने आतापर्यंत चार मराठी चित्रपटात काम केले आहे. त्यापैकी चर्चा झाली ती महेश मांजरेकर यांच्या् 'एफ यु' या चित्रपटाची. यात वैदेहीने सैराट फेम आकाश ठोसरबरोबर काम केले आहे. वैदेहीने आतापर्यंत 'वेड लावी जीवा', 'वृंदावन', 'कोकणस्थ', आणि 'एफयु' या मराठी चित्रपटांत काम केले आहे. लेड लावी जीवा या चित्रपटात ती आदिनाथ कोठारे तर वृंदावन चित्रपटात वैदेही राकेश बापटसोबत झळकली आहे. 

 

इतकेच नव्हे तर वैदेहीने 'वजीर' या हिंदी चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबरही काम केले आहे. यातील तिची भूमिका लहान असली तरी ती प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. वैदेही परशुरामीने कथ्थक नृत्यकलेचे प्रशिक्षण घेतले आहे. महेश मांजरेकर यांच्या आगामी हिंदी-तामिळ चित्रपटात वैदेहीची भूमिका असल्याच्या बातम्या येत आहेत.

 

आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे काही सुरेख फोटोज् आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. 

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा वैदेही परशुरामीचे काही खास PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...