आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या विनोद सम्राज्ञीने एकेकाळी केले होते लिपस्टिक-साड्या विक्रीचे काम, आता कपिलसोबत हसवणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः स्टॅण्ड अप कॉमेडी करणा-या मराठी कलाकारांपैकी एक प्रसिद्ध नाव म्हणजे अभिनेत्री विशाखा सुभेदार. 'फु बाई फु', ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या शोजमधून विशाखा यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप सोडणा-या विशाखा आता लवकरच विनोदाचा बादशाह कपिल शर्मासोबत झळकणार आहेत. छोट्या पडद्यावर त्या प्रेक्षकांना हसवताना आहेत.

 

कपिल शर्मा एका गेम शोद्वारे टीव्हीवर पुनरागमन करतोय. या शोच्या प्रोमोचे अलीकडेच शूट पूर्ण झाले. या प्रोमो शूटचा एक स्क्रिन शॉट समोर आला आहे. यामध्ये कपिल आणि विशाखा सुभेदार दिसत आहेत. प्रोमोची झलक बघता विशाखा मोलकरणीच्या भूमिकेत दिसत आहेत.आतापर्यंत विविध शोज, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या विशाखा यांची कपिलसोबतची जुगलबंदी बघायला त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक असणार आहेत.

 

जाणून घेऊयात विशाखा सुभेदार यांच्याविषयी... 

बातम्या आणखी आहेत...