आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनय, मालिका आणि सिनेमांमध्ये आपले टॅलेन्ट दाखवणारा 'ऋत्विक केंद्रे'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टार प्रवाहवरील मानसिचा चित्रकार तो हि मालिका आपल्या सगळ्यांनाच चांगल्याच परिचयाची आहे. या मालिकेत "विहान"ची भूमिका साकारणारा ऋत्विक केंद्रे अवघ्या काही वेळातच प्रेक्षकांचा लाडका झाला.  सुप्रसिद्ध  नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांचा मुलगा असलेल्या ऋत्विकला अभिनयाचे बाळकडू  घरातून लाभले होते. लहानपानपासूनच अभिनयाचे संस्कार झाले असल्यामुळे  ऋत्विक जाहिरात, नाटक, मालिका, सिनेमा या क्षेत्रांमध्ये अगदी बिनधास्त वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 

 

ऋत्विकने महाविद्यालयात असताना "झुलवा",  "जलेबी" या मराठी तसेच “लुक्का छुपी”, “मेरा बेटा चोर है”, “वो चार पन्ने” या हिंदी तर “गोची  शाकुंतल” या इंग्रजी तसेच  गुजराती “जयंतीलालनी सायकल” अशा विविध नाटकांमध्ये अभिनय केला आहे. ऋत्विकच्या  "झुलवा" या नाटकाचे आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संपूर्ण महाराष्ट्रात अनेक प्रयोग झाले आहेत. ऋत्विकच्या "मोहे पिया", "ओ माय लव्ह" आणि "प्रिया बावरी" या नाटकांचे विविध भाषांमध्ये ४१० पेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत. या प्रयोगांची दखल "इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड बुक"ने दखल घेतली आहे. आगामी वर्षात ऋत्विकचे "ड्रायडे" आणि "सरगम" हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार असून या दोन्ही सिनेमात ऋत्विकने मुख्य भूमिकेत काम केले आहे.या दोन्ही सिनेमातील त्याच्या व्यक्तिरेखांसाठी ऋत्विक खूप मेहनत घेत आहे. या दोन्ही सिनेमातून  ऋत्विक आपल्याला एका वेगळ्या अंदाजात भेटीला येणार आहे. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ऋत्विक केंद्रेचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...