आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Women's day spcl: चिन्मयपासून वीणा जामकरपर्यंत पाहा काय संदेश देताय मराठी सेलिब्रेटीज्

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक मुलगी हि घराची शोभा असते, स्त्री गुह्लक्ष्मी असते, बहिण भावाच्या मनगटावर असेलेली शान असते. समाजात, घरात स्त्रीचे स्थान खूप महत्वाचे आहे. एक स्त्री जितक्या कुशलतेने घर सांभाळते अगदी तितक्याच कुशलतेने ती काम, व्यवहार या देखील बाबी निपुण पणे पार पाडत असल्याचे दिसून येते. अनेक बाकीच्या क्षेत्रात देखील स्त्रियांचा ठसा उमटलेला दिसून येतो. मग अश्या या स्त्रियांना महिला दिवस निमित्ताने कलर्स मराठीवरील लाडक्या कलाकारांनी काही मोलाचे सल्ले दिले.

 

चिन्मय उदगीरकर (अक्षय घाडगे - घाडगे & सून) – स्त्री ही सगळ्याच बाजूंनी पुरुषापेक्षा श्रेष्ठ 


चिन्मय म्हणतो,  "स्त्री  ही सगळ्याच बाजूंनी पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. सहनशीलता, परिस्थितीशी जुळवून घेणे, माणसा-माणसातील नाते संबंध टिकण्याच्या दृष्टीने जो समंजस स्वभाव लागतो या सगळ्या अनुषंगाने. आज जी अराजकता वाढली आहे त्यावर मात करण्यासाठी त्यावरचा उपाय शोधण्यासाठी संयम, सहनशीलता, समजूतदारपणा, सर्वसमावेशकता हे गुण महत्वाचे आहेत आणि याच मूर्तीमंत प्रतिक म्हणजे 'स्त्री'. स्त्री सर्वार्थाने समाजाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. तसेच नवनिर्मितीचा अधिकार देखील देवाने स्त्रीला दिला आहे. त्यामुळे स्त्रीयांनी खंबीरपणे प्रत्येक बिकट क्षणाला सामोरी जावं तिला कोणाच्याही सहानभूतीची आधाराची गरज नाही असं मला वाटत."

 

वीणा जगताप (राधा देशमुख - राधा प्रेम रंगी रंगली) - धीट बना
वीणा म्हणते, "Women is Attitude and Woman is Gratitude या वर्षी महिलादिनानिमित्त मी सगळ्या स्त्रियांना सांगू इच्छिते कि धीट बना ! देवाने स्त्रीला सगळ्यात मोठा हक्क दिला आहे ती म्हणजे एका दुसऱ्या जीवाला या जगात आणण्याचा. म्हणजे स्त्रीमध्ये किती सामर्थ्य, किती शक्ती असेल याची जाणीव ठेवा आणि तसं आलेल्या समस्यांन सामोरं जा. आपल्याला स्त्री जन्म लाभला आहे हे आपले भाग्य आहे."

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, इतर मराठी सेलिब्रेटींचे महिला दिना निमित्तचे काही खास संदेश...

बातम्या आणखी आहेत...