आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day Bash: सई-तेजस्विनीसह या सेलेब्सनी केली संजय जाधवांच्या पार्टी धमाल, दुहेरी ठरले सेलिब्रेशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः  'आई शप्पथ', 'सातच्या आत घरात' अशा सुपरहिट सिनेमांचे छायाचित्रण, 'चेकमेट साठी कथालेखन, पटकथालेखन, छायाचित्रण आणि दिग्दर्शन अशा चौकोनी भूमिका साकारणारे, 'दुनियादारी' या ब्लॉकबस्टर सिनेमाचे दिग्दर्शन करणारे संजय जाधव यांनी 17 जुलै रोजी आपला 48वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने फिल्म इंडस्ट्रीतील मित्रांसाठी त्यांनी एका जंगी पार्टी आयोजित केली होती. या बर्थडे पार्टीत मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्स सहभागी झाले होते.

 

सई ताम्हणकर, कोरिओग्राफर उमेश जाधव, हर्षदा खानविलकर, तेजस्विनी पंडीत, अमितराज यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी संजय जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय जाधव यांच्यासाठी एक खास केक तयार करण्यात आला होता. बिकिनी गर्लच्या रुपातील केक यावेळी संजय यांनी कापला.

 

विशेष म्हणजे संजय जाधव यांनी यावेळी दुहेरी सेलिब्रेशन केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'दुनियादारी' या चित्रपटाच्या रिलीजला 19 जुलै रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. याचनिमित्ताने 'दुनियादारी'च्या टीमसोबत त्यांनी आणखी एक खास केक कापला.  यावेळी रॉक बँडचेही आयोजन करणयात आले होते. पार्टीत पोस्टर फाडून संजय जाधवांनी एंट्री घेतली. सर्वच सेलिब्रिटींनी संजय जाधव यांच्यासह यावेळी मस्त धमाल केली. अनेकांनी पार्टीत ठेकाही धरला.

 

मुळचे केमिकल इंजिनिअर असलेले संजय जाधव यांनी आपल्या करिअरची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शकाच्या रुपात केली. मराठीतील प्रसिद्ध छायाचित्रणकार आणि दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती आहे. लवकरच ते प्रेक्षकांच्या भेटीला 'लकी' हा त्यांचा नवीन चित्रपट घेऊन येणार आहेत. 

 

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला संजय जाधव यांच्या बर्थडे सेलिब्रेशनची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा संजय जाधव यांच्या बर्थडे पार्टीतील सेलिब्रिटींची धमालमस्ती...

 

बातम्या आणखी आहेत...