आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृती कलादर्पण अवॉर्ड सोहळ्याला मराठी स्टार्सनी लावले चारचाँद, बघा खास PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मराठी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकांतील सर्वोत्कृष्ट कलाकृती आणि सेलिब्रेटींचे धमाल परफॉर्मन्सेस असलेला संस्कृती कला दर्पण पुरस्कार सोहळा 10 जून रोजी दुपारी 1 आणि संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित झाला. अर्चना नेवरेकर फाऊंडेशनतर्फे आयोजित संस्कृती कला दर्पण सोहळ्यात यंदाही चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिका क्षेत्रातील सर्वोत्तम कलाकृतींचा सन्मान करण्यात आला. मराठी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर कलाकारांची मांदियाळी या सोहळ्याला लोटली होती. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांना कलागौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मराठी मनोरंजन क्षेत्राकडून मिळालेला हा पुरस्कार स्वीकारताना ते भावूक झाले होते.


 या सोहळ्याला अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुचित्रा बांदेकर, आदेश बांदेकर, क्रांती रेडकर यांच्यासह मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

 

एक नजर टाकुयात विजेत्यांच्या नावावर...  आणि पुढील स्लाईड्सवर बघा, या सोहळ्याची खास क्षणचित्रे... 


नाटक विभाग –
सर्वोत्कृष्ट नाटक – संगीत देवबाभळी  (भद्रकाली प्रोडक्शन्स), अनन्या ( सुधीर भट प्रोडक्शन्स)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – प्राजक्त देशमुख ( संगीत देवबाभळी )
सर्वोत्कृष्ट लेखक  - प्रताप फड  (अनन्या)
सर्वोत्कृष्ट लक्षवेधी नाटक - ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’
सर्वोत्कृष्ट अभिनेता – मकरंद अनासपुरे (उलट सुलट ), भरत जाधव (वेलकम जिंदगी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – शुभांगी सदावर्ते ( संगीत देवबाभळी ), ऋतुजा बागवे (अनन्या)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता -  प्रमोद  पवार, सिद्धार्थ बोडके (अनन्या)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शिवानी रांगोळे  (वेलकम जिंदगी)
लक्षवेधी अभिनेता – अमोल कोल्हे (अर्धसत्य )
लक्षवेधी अभिनेत्री - अतिषा नाईक  ( अशी ही श्यामची आई)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य – संदेश बेंद्रे  (अनन्या)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा  -  चैत्राली डोंगरे  (वेलकम जिंदगी)
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – भूषण देसाई (अनन्या), प्रफुल्ल दिक्षित ( संगीत देवबाभळी )
सर्वोत्कृष्ट संगीत – आनंद ओक (संगीत देवबाभळी )
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री  - वनिता खरात  ( हम पांच)
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता – आनंद इंगळे ( ९ कोटी ५७ लाख ) 

 

चित्रपट  विभाग
सर्वोत्कृष्ट चित्रपट  - पळशीची पि.टी  ( ग्रीन प्रोडक्शन)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक -  प्रसाद ओक (कच्चा लिंबू),
सर्वोत्कृष्ट कथा – धोंडिबा कारंडे (पळशीची पि.टी)
सर्वोत्कृष्ट पटकथा -  अमोल  गोळे  (नशीबवान)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – भालचंद्र कदम (नशीबवान)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – सोनाली कुलकर्णी (कच्चा लिंबू), किरण  ढाणे (पळशीची पि.टी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – शशांक शेंडे (बंदुक्या ), अंशुमन विचारे (कॉपी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - छाया कदम  (रेडू)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – अथर्व  बेडेकर  (अंड्याचा फंडा)
सर्वोत्कृष्ट संगीत – निलेश मोहरीर (तुला कळणार नाही)
सर्वोत्कृष्ट संवाद  - हर्षवर्धन (मंत्र)
प्रथम पदार्पण दिग्दर्शक – विक्रम फडणीस (हृदयांतर)
लक्षवेधी चित्रपट – कच्चा लिंबू ( टिमवर्क अल्ट्रा क्रिएशन्स)
स्पेशल ज्युरी  पुरस्कार  - मुरांबा ( दशमी स्टूडीयोज)
सामाजिक चित्रपट पुरस्कार - अॅट्रॉसिटी’ (आर .पी प्रोडक्शन)
सर्वोत्कृष्ट छायांकन – फसाहत खान (मांजा)
सर्वोत्कृष्ट संकलन  - चारुश्री  रॉय (मांजा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – अवधूत गुप्ते (बॉइज)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - नेहा राजपाल ( तुला कळणार नाही )

 


मालिका विभाग 
सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका  - नकळत सारे घडले  (स्टार प्रवाह )
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निरंजन पत्की  – (नकळत सारे घडले )
सर्वोत्कृष्ट अभिनेता – हरिश दुधाडे – (नकळत सारे घडले )
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -  नुपूर परुळेकर  (नकळत सारे घडले )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सुनील तावडे  ( दुहेरी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – निवेदिता सराफ ( दुहेरी)
लक्षवेधी मालिका  - विठू माऊली ( स्टार प्रवाह ), बापमाणूस ( झी युवा)
कथाबाह्य मालिका – द रिअल हिरो कथा समृद्धीच्या ( झी मराठी )

बातम्या आणखी आहेत...