आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: अवॉर्ड फंक्शनमध्ये मानसीच्या 'घुमर..'ने वेधले लक्ष, सिद्धार्थसह या स्टार्सनी केले परफॉर्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांचा गौरव करणारा संस्कृती कलादर्पण गौरव रजनी सोहळा नुकताच छोट्या पडद्यावर प्रसारित झाला. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं.  अर्चना नेवरेकर फाऊंडेशनतर्फे दरवर्षी संस्कृती कलादर्पण पुरस्कार देण्यात येतात. यंदाही चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिका क्षेत्रातील सर्वोत्तम कलाकृतींचा सन्मान करण्यात आला. मराठी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.


या रंगारंग सोहळ्यात कलाकारांनी  दमदार परफॉर्मन्स सादर केले. सई देवधरची ठसकेबाज लावणी आणि गश्मीर महाजनीच्या रॉकिंग परफॉर्मन्सने उपस्थितांची मन जिंकली. तर, मानसी नाईकच्या घुमरनं उपस्थितांची दाद मिळवली. या सोहळ्यात स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांतील कलाकारांनीही लक्षवेधी नृत्याविष्कार सादर केला. हरीश दुधाडे, नुपूर परुळेकर, अक्षर कोठारी, ऐतशा संझगिरी, रुपल नंद, समीर परांजपे, ज्ञानदा रामतीर्थकर, गौरव घाटणेकर, अजिंक्य राऊत, एकता लब्दे, सायली देवधर आणि विकास पाटील यांच्या परफॉर्मन्सने सोहळ्याची रंगत आणखी वाढली.


पाहुयात, कलाकारांच्या परफॉर्मन्सची खास झलक छायाचित्रांमध्ये...

बातम्या आणखी आहेत...