आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : \'मस्का’चे झाले ट्रेलर-म्युझिक लाँच, हात फ्रॅक्चर असताना पोहोचली प्रार्थना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धम्माल विनोदासह सस्पेन्स आणि थ्रीलरचा तडका असलेल्या अमोल जोशी प्रोडक्शन्स व स्वरूप रिक्रीएशन्स  अँड    मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि   मोरेश्वर प्रॉडक्शन्स  निर्मित आगामी ‘मस्का’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबई पार पडला. 


म्युझिक लाँचला पोहोचले हे सेलेब्स... 
अभिनेता, नाट्य दिग्दर्शक अशी ओळख असलेला प्रियदर्शन जाधव ‘मस्का’ मधून चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. या सोहळ्याला अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, अनिकेत विश्वासराव, चिन्मय मांडलेकर, प्रणव रावराणे, शशांक शेंडे आणि विद्याधर जोशी, संगीतकार चिनार आणि महेश, गायक महालक्ष्मी अय्यर, अवधूत गुप्ते, गणेश चंदनशिवे, गीतकार मंगेश कांगणे, व्हीडीओ पॅलेसचे नानूबाई सिंघानी,  निर्माते प्रशांत पाटील, प्रस्तुतकर्ते सचिन नारकर, विकास पवार, आकाश पेंढारकर, विनोद सातव आदी मान्यवर उपस्थित होते.


हात फ्रॅक्चर असताना पोहोचली प्रार्थना...
अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिच्या गाडीला आठवड्याभरापूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघात झाला होता. या अपघातात प्रार्थनाचा उजवा हात फ्रॅक्चर झाला. हात फ्रॅक्चर असताना ती या सोहळ्याला आवर्जुन हजर राहिली. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रार्थना तिचा सहकलाकार अनिकेत विश्वासरावसोबत कोल्हापुरच्या दिशेने निघाली होती. वाटेत त्यांच्या कारला मोठा अपघात झाला. सुदैवाना यात जीवितहानी झाली नाही.  

 

ही आहे चित्रपटाची वनलाइन... 
‘मस्का’ चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये अनिकेत विश्वासराव हा काहीसा हतबल दिसत असून शशांक शेंडे हे कधी चिंतीत तर कधी नाट्यमय प्रसंगात दिसत आहेत, तर प्रणव रावराणे हा एका स्पेशल चाईल्ड असल्याचे दिसते. तसेच चिन्मय मंडलेकर पहिल्यांदाच विनोदी शैलीत दिसणार आहे, आजवर अनेक चित्रपटातून सोज्वळ भूमिका साकारणारी अभिनेत्री  प्रार्थना बेहेरे प्रथमच हटके अशा बोल्ड अंदाज मध्ये पडद्यावर आपल्याला बघायला मिळेल. तिचा हा हटके अंदाज सर्वांनाच भुरळ पाडतोय. चित्रपटाच्या ट्रेलर सोशल मिडीयावर उत्तम प्रतिसाद मिळाला असून ‘मस्का’ चित्रपटातील गाणी देखील अत्यंत लोकप्रिय झाली आहेत. गणेश चंदनशिवे यांनी गायलेले ‘बया’ गाणे तरुणाईने चांगलेच डोक्यावर घेतले आहे तर ‘चला पटकन पकडा पोकेमॉन’ या गाण्याचीही तरुणाईला भुरळ पडल्याचे दिसते. 


1 जूनला रिलीज होणार चित्रपट... 
मोरेश्वर प्रॉडक्शन्स निर्मित, अमोल जोशी प्रॉडक्शन्स आणि स्वरूप रिक्रिएशन्स अँड मिडिया प्रा. ली. प्रस्तुत ‘मस्का’ चे प्रशांत पुरुषोत्तम पाटील निर्माते आहेत, तर प्रस्तुतकर्ता सायली जोशी,सचिन नारकर, विकास पवार आणि सह प्रस्तुतकर्ता आकाश पेंढारकर आणि विनोद सताव आहेत. अत्यंत हटके विषयावरील सस्पेन्स, थ्रीलर आणि कॉमेडी असा मनोरंजनाचा फुल टू तडका असलेला ‘मस्का’ हा चित्रपट येत्या 1 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


पाहुयात, मस्काच्या म्युझिक आणि ट्रेलर लाँच इव्हेंटला पोहोचलेल्या सेलेब्सचे Photos.. 

 

बातम्या आणखी आहेत...