आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्ही. शांतारामनिर्मित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट 'पिंजरा' म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड. संध्या आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाच्या रिलीजला 31 मार्च रोजी 46 वर्षे पूर्ण होत आहेत. 31 मार्च 1972 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाची जादू एवढ्या वर्षांनंतरही प्रेक्षकांवर कायम आहे. या चित्रपटात डॉ. श्रीराम लागू आणि संध्या यांच्यासह अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. वत्सला देशमुख आणि नीळू फुले या कलाकारांसह सरला येवलेकर, माया जाधव, उषा नाईक, शोभा सासने, अनिता वंटमुरीकर, के. घोरपडे, दत्ता सागर, आनंदा पाटील, बाळ वेदांते, अनंत किमये, नर्मदा मोरे, बाळासाहेब गावडे, भालचंद कुलकुर्णी, बी. माजनाळकर, काका चिटणीस, पंडीत विधाते, जी. सावंत, जी मल्लेश अशी मोठी स्टारकास्ट या चित्रपटात होती. यापैकी आता अनेक कलाकार या जगात नाहीत. तर डॉ. श्रीराम लागू यांनी वयाची नव्वदी ओलांडली आहे. तर अभिनेत्री संध्या यांनीही वयाची ऐंशी वर्षे पार केली आहेत. तर अभिनेते निळू फुले आता या जगात नाहीत.
एक नजर टाकुया, पिंजरातील कलाकारांच्या तेव्हाच्या आणि आत्ताच्या लूकवर...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.