आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'शिकारी\'च्या स्क्रिनिंगला पोहोचली सुव्रत जोशीची GF!, ग्लॅमरस लूकमध्ये दिसली नेहा खान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'शिकारी' हा मराठीतील बहुचर्चित चित्रपट शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. बोल्ड धाटणीचा चित्रपट म्हणून याकडे बघितले जात आहे. विजू माने दिग्दर्शित या चित्रपटाचे शुक्रवारी मुंबईत स्पेशल स्क्रिनिंग झाले.  या स्क्रिनिंगला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. 

 

पोहोचली सुव्रत जोशीची गर्लफ्रेंड...

या चित्रपटातून दिल दोस्ती दुनियादारी फेम सुव्रत जोशी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. स्क्रिनिंगला अभिनेत्री सखी गोखले हिने हजेरी लावली होती. सुव्रत आणि सखी रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा मराठी चित्रपटसृष्टीत रंगत आहे. यावेळी सखीचा अस्सल मराठमोळा लूक बघायला मिळाला. यलो कलरच्या साडीत ती अतिशय सुंदर दिसली. 

 

या कलाकारांनी बघितला शिकारी...

शिकारीच्या स्क्रिनिंगला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेता कुशल बद्रिके, कश्मिरा शाह, मंजिरी ओक, प्रसाद ओक, भाऊ कदम यांच्यासह अनेकजण यावेळी उपस्थित होते. नेहा खानचा ग्लॅमरस लूक यावेळी बघायला मिळाला.

 

या कलाकारांच्या आहेत चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका... 

अॅडल्ट कॉमेडी असलेल्या या चित्रपटात चला हवा येऊ द्या आणि इतर मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेले भालचंद्र कदम, भारत गणेशपुरे आणि वैभव मांगले महत्वाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, संदेश उपश्याम, जीवन कराळकर आणि दुर्गेश बडवे यांच्याही महत्वाच्या भूमिका यात आहे.

 

नेहा खान मेन लीडमध्ये...

चित्रपटाचे पोस्टर्स रिलीज झाले तेव्हापासूनच याविषयीची उत्सकुता ताणली गेली होती.  अ लाफ रायट, अ सेक्स कॉमेडी विथ अ मेसेज, असे ब्रीदवाक्य चित्रपटाच्या पोस्टर्सवर झळकली आहेत. या चित्रपटात नेहा खान हिची मध्यवर्ती भूमिका आहे, तर तेवढीच महत्वाची भूमिका दिल दोस्ती दुनियादारी फेम सुव्रत जोशीने यात साकारली आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, शिकारीच्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या मराठी सेलेब्सची खास छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...