आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Marathi Film Ziparya Special Screening Screening : \'झिप या\' बघायला पोहोचले मराठी सेलेब्स, अमृताचा दिसला ग्लॅमरस लूक

Screening : \'झिप-या\' बघायला पोहोचले मराठी सेलेब्स, अमृताचा दिसला ग्लॅमरस लूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आधारित ‘झिपऱ्या’ चित्रपट आज रिलीज झाला आहे. तत्पुर्वी गुरुवारी मुंबईत या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींसाठी ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला अभिनेत्री अमृता सुभाष, कोरिओग्राफर उमेश जाधव, राहुल मेहंदळे, श्वेता मेहंदळे, पुर्वा गोखले, पल्लवी वैद्य, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी यांच्यासह अनेक जण एकत्र आले होते.

 

ही आहे चित्रपटाची वनलाइन  

मुंबईसह  अनेक मोठ्या रेल्वे स्टेशनवर आपण अनेकदा बूट पॉलिश करणारी किशोरवयीन मुले बघितली असतील.  ‘झिपऱ्या’ चित्रपट अशाच मुलांच्या भोवती फिरणारा आहे.  यामध्ये रेल्वे स्टेशनवर बूट पॉलीश करणाऱ्या एका तरुणाचा अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास मांडण्यात आलेला आहे. सभोवतालची परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी सुद्धा भविष्याबाबत तो निराश नाही. दरम्यान, या जगण्याच्या संघर्षात झिपऱ्याला पोलिसांची भीती का वाटू लागते ? झिपऱ्या आपल्या बहिणीच्या लग्नाच्या टेन्शन मध्ये नेमकं काय काय करतो ? असे अनेक प्रश्न या चित्रपटात पडतात. या कथेत असलेलं एक गूढ आणि त्या भोवती घेरलेलं झिपऱ्याचं आयुष्य आहे. तर दुसऱ्या बाजूला दारिद्र्य, हालअपेष्टा यांच्यावर मात करून स्वतःसह मित्रांच्या आयुष्यात सोनेरी रंग भरण्यासाठी तो  धडपड करत आहे.  


या कलाकारांच्या आहेत भूमिका... 
अश्विनी दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ची निर्मिती रणजीत दरेकर यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन केदार वैद्य यांचे आहे. यामध्ये चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी, अभिनेत्री अमृता सुभाष, अमन अत्तार, देवांश देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर अशी कलाकारांची तगडी फौज आहे. ‘झिपऱ्या’चे एक खास वैशिष्ट्ये म्हणजे या चित्रपटाचे पार्श्वसंगीत ज्येष्ठ पर्कशनिस्ट तौफिक कुरेशी यांनी दिले आहे. या चित्रपटाला समीर सप्तीसकर, ट्रॉय - अरिफ यांनी संगीत दिले असून अभिषेक खणकर, समीर सामंत यांनी गीते लिहिली आहेत. कला दिग्दर्शक विनायक काटकर, नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव तर डीओपी राजेश नादोने आहेत. तीन राज्य पुरस्कार या चित्रपटाने पटकावले आहेत. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला जमलेल्या कलाकारांची छायाचित्रे...

 

बातम्या आणखी आहेत...