आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी सिनेमा 'सायकल'ची रिलीज डेट आली समोर, भाऊ कदम-प्रियदर्शन जाधवच्या आहेत मुख्य भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वायकॉम18 मोशन पिक्चर्सने आज त्यांचा आगामी मराठी सिनेमा सायकलच्या प्रदर्शनाची तारीख ४ मे २०१८ ही जाहीर केली. या हलक्या फुलक्या कथेमुळे तुम्ही तुमचा स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास सुरू कराल. कॉफी आणि बरंच काही, अँड जरा हटके आणि हंपी सारख्या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलेला आहे. एमएफए आणि थिंक व्हाय नॉट च्या सहयोगाने हॅपी माइंड द्वारा निर्मित सायकल चे सादरीकरण वायकॉम18 मोशन पिक्चर्सने केले आहे. हृषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम हे कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिका साकारत आहेत. 

 

वायकॉम18 मोशन पिक्चर्सचे सीओओ, अजित पंधारे म्हणाले, “वायकॉम18 मोशन पिक्चर्सचे ध्येय आहे प्रेक्षकांना सर्व भाषांमधील सर्वोत्कृष्ट विषय असणारे चित्रपट देण्याचे. आमचा ठाम विश्वास आहे की, प्रांतीय सिनेमा मार्केटमध्ये भरपूर प्रचुर विषय आहेत आणि आमचा हेतू फक्त ते शोधून काढण्याचा आहे. मराठी सिनेमा विश्वातील “आपला मानूस”च्या अभूतपूर्व यशानंतर, आमचा नवीन मराठी सिनेमा “सायकल” सादर करण्यात मला खूपच अभिमान वाटत आहे. हा सिनेमा आमच्या प्रेक्षकांची नक्कीच विशेष पसंती मिळवेल त्याचबरोबर उत्तम प्रतिसाद मिळवेल असे मला वाटते आहे.”

 

सायकल सिनेमा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. या सिनेमात सायकल वर अतिशय प्रेम असलेल्या प्रमुख पात्राचे केशवचे हृद्यस्पर्शी चित्रण आहे. केशवच्या गावात आलेल्या दोन अज्ञात व्यक्ती ही सायकल चोरतात. केशवला त्याची सायकल परत मिळते का? चोरांनी सायकल का चोरली आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सायकल हा सिनेमा नक्की बघा.

बातम्या आणखी आहेत...