आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा पार पडला 'गुलाबजाम' ट्रेलर लाँच इव्हेंट, शेफच्या रुपात दिसले दिग्दर्शक सचिन कुंडलकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा आगामी चित्रपट 'गुलाबजाम'चा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटाच्या टीमसह दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनीही हजेरी लावली. पण सचिन यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधणारी होती. यावेळी त्यांनी शेफप्रमाणे वेशभुभा केली होती. पांढऱ्या-गुलाबी साडीत सोनालीही शोभून दिसत होती. गुलाबजाम या चित्रपटात सोनालीने शेफची भूमिका केली आहे. 

 

चित्रपटात सिद्धार्थने लंडन रिटर्न मुलाची भूमिका केली आहे ज्याला सोनालीकडून अस्सल मराठमोळा स्वयंपाक शिकायचा आहे. खूप प्रयत्नानंतर त्याची शिकवणी सुरु होते पण नंतर त्याच्यासोबत कायकाय घडते याची कथा चित्रपटात सांगण्यात आली आहे. गुलाबजाम हा चित्रपट येत्या 16 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'गुलाबजाम' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...