आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिग्दर्शक रवी जाधव यांचा विवादीत सिनेमा 'न्यूड'ची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. येत्या 27 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे नाव आणि त्याचा विषय यावरुन खूप विवाद झाले होते. पण अखेर आता हा सिनेमा रिलीज होणार असल्याने चित्रपट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा चित्रपट 'ए' सर्टिफिकेटसह प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री विद्या बालनसह ज्युरीने या चित्रपटाला स्टँडीग ओवेशन देत कौतुक केले होते. कोणत्याही कट्सविना हा चित्रपट 27 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.
काय होता विवाद...
गोवा येथे होणाऱ्या (IFFI)आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन होणार होते ते 'न्यूड' चित्रपटाने. पण ऐनवेळी चित्रपट निवड समितीच्या सदस्यांनी या चित्रपटाला बाहेरचा रस्ता दाखवला आणि दिग्दर्शक रवी जाधव यांनी याबद्दल खेद व्यक्त केला. मराठी अभिनेत्री राजश्री देशपांडेची मूख्य भूमिका असलेला चित्रपट 'एस दुर्गा'ही महोत्सवातून काढून टाकण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली होती. न्यूडचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी न्यायासाठी कोर्टाचे दार ठोठावले होतेतर सर्व मराठी चित्रपटसृष्टी रवी जाधव यांच्या बाजूने उभे राहिली होती.
दुसरा विवाद..
'न्यूड' या चित्रपटाची कथा आपल्या पुस्तकातून चोरल्याचा आरोप हिंदी लेखिका मनिषा कुलश्रेष्ठ यांनी लावला होता. मनिषा यांनी सांगितले होते की, "मी रवी जाधव यांच्याशी अगोदरच संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता पण तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली पण टीझर पाहिल्यानंतर ही माझीच लघुकथा असल्याचे मला कळाले आहे. लेखकांना पैसे किंवा सौजन्य देण्याची वृत्ती नसल्याने आता या विरोधात कोर्टात जाईल' असा इशाराही त्यांनी दिला होता.
आता अखेर हे सर्व विवाद निवळले असून अखेर हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाल्याचे समोर आले आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, 'न्यूड' चित्रपटाचे काही खास Photos...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.