आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सलमान सोसायटी' मराठी चित्रपटाचा अभिनेता सोनू सूदने केला मुहूर्त क्लॅप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता ​सोनू सूद यांनी नुकतेच लेखक आणि दिग्दर्शक कैलाश काशीनाथ पवार यांच्या ​पहिल्या मराठी चित्रपट ​'सलमान सोसायटी'​ ​​​साठी मुहूर्त क्लॅप ​दिला. हा चित्रपट प्राजक्ता एंटरप्रायझेस आणि ए​ ​आर एन्टरप्रायझेस ​या बैनर द्वारा निर्माण करण्यात येत आहे.

 

चंद्रकांत पवार आणि रेखा सुरेंद्र जगताप संयुक्तपणे 'सलमान सोसायटी"' या चित्रपटाची निर्मिति करत ​असून हा चित्रपट '​पढ़ेगा इंडिया ​तो बढ़ेगा इंडिया' ​या टॅगलाइन वर असेल, तसेच​ हा चित्रपट बाल शिक्षण विषयावर केंद्रित ​असेल तरीही ह्या चित्रपटात कथे सह कॉमेडी चा तड़का ही दिसेल.​ ​​विनम्र अभिनेते ​सोनू सूद ​प्रादेशिक भाषिक चित्रपटांना प्रोत्साहन देणे पसंत करतात​ जेव्हा नवोदित दिग्दर्शक कैलाश पवारने सोनू सूदला मुहूर्त क्लॅप बद्दल विचारणा केली तेव्हा क्षणाचा ही विलंब न करता त्यांनी होकर दिला व चित्रपटासाठी ​मुहूर्त क्लॅप​ दिला.

 

​मराठी चित्रपट ​सलमान सोसायटीचा पहिला ​शेडूल मार्चच्या ​मध्या ​दरम्यान यावर्षी सुरू ​होणार असून चित्रपटाची स्टारकास्ट सध्या​ गुलदस्त्यात आहे.

बातम्या आणखी आहेत...