आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण प्रेमकथा 'वंटास' येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ४ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ग्रामीण प्रेमकथांचा ट्रेंड आला असला तरी तसाच वाटणारा पण वेगळा असलेला 'वंटास' या चित्रपटाचीही भर पडणार आहे. नवी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियात लाँच करण्यात आला आहे. गुरूकृपा प्रॉडक्शन एंटरटेन्मेंटच्या अमोल बापूराव लवटे यांनी चित्रपटाची निर्मिती केली  असून  ज्ञानेश्वर यादवराव उमक यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

 

'वंटास' ही कथा आहे गौरी आणि आंब्या यांची... उनाडक्या करणारा आंब्या गौरीच्या प्रेमात पडतो आणि तिला मिळवण्यासाठी त्याला काय काय करावं लागतं  याची ही 'वंटास' गोष्ट आहे. अजय वरपे, स्नेहल, अक्षय माहूलकर, रमेश वेदपाठक हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. 

आगळंवेगळ्या नावामुळे या चित्रपटानं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र, चित्रपट कसा आहे हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पहावी लागणार असून ४ मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...