आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेणुका शहाणेंना आजही म्हणतात 'सलमानची भाभी', या मराठी अभिनेत्रींनीही गाजविले आहे बॉलिवूड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज अभिनेत्री रेणुका शहाणे त्यांचा 53वा वाढदिवस साजरा करत आहे. 27 मार्च 1965 रोजी मुंबईत जन्मलेल्या रेणुका यांना आजही सलमानची भाभी म्हणून ओळखले जाते. त्याचे कारण म्हणजे त्यांनी हम आपके है कौन या चित्रपटात केलेली सलमानच्या भाभाीची भूमिका. बॉलिवूडमध्ये नाव कमावणाऱ्या मराठी अभिनेत्रींमध्ये रेणुका शहाणे यांचे नाव घेतले जाते. पण केवळ रेणुकाच नाही तर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या मुळच्या मराठी कुटुंबात जन्मलेल्या आहेत. आज रेणुका यांच्या  वाढदिवसानिमित्त अशाच काही अभिनेत्रींची माहिती घेऊन आलो आहोत. माधुरी आहे बॉलिवूडची अग्रणीची अभिनेत्री..

 

माधुरी दीक्षित - केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात माधुरी दिक्षीतचे चाहते आहेत हे वेगळे सांगायला नको. लहानपणी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या माधुरीला लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती. त्यामुळे वयाच्या 16 व्या वर्षीच माधुरीने पहिला चित्रपट 'अबोध' केला. आज हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून माधुरी दिक्षितचे नाव घेतले जाते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, इतर काही मराठमोळ्या अभिनेत्री ज्यांनी बॉलिवूडमध्ये कमावले नाव...